शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:00 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या गावात ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आहे. नवरात्रामध्ये जागरादिवशी ही ‘डोक्यावरील आरती’ केली जाते.

ठळक मुद्दे‘डोक्यावरील आरती’चा आजरा तालुक्यात थरार, प्रथा अजूनही जिवंत‘चांगभलं’च्या गजरामध्ये उत्साही वातावरणात आरती

समीर देशपांडे

कोल्हापूर (आजरा) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या तालुक्याच्या गावात ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आहे. नवरात्रामध्ये जागरादिवशी ही ‘आरती’ केली जाते. बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता आजरा येथे हा ‘डोक्यावरील आरती’चा थरार भाविकांना पहायला मिळाला. गेली अनेक वर्षे सुरु असलेली ही प्रथा आजरा शहरामध्ये अजूनही जिवंत आहे.

डोक्यावरून आरतीचे ताट पडल्यास संबंधित गुरवाला शिक्षा केल्याची उदाहरणे भूतकाळामध्ये आहेत. मात्र गेली अनेक वर्षे ही आरती सहजपणे पार पडत आली आहे. बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता आजरा येथे हा ‘डोक्यावरील आरती’चा थरार भाविकांना पहायला मिळाला. ही आरती उत्साही वातावरणात संपन्न झाली.‘डोक्यावरील आरती’ करण्यापूर्वी देवस्थानचे गुरव यांच्या डोक्याचे पूर्ण मुंडण केले जाते. तुळतुळीत डोक्यावर पितळी ताट ठेवले जाते. त्यामध्ये कणिक मळून दिवा केला जातो आणि हा पेटता दिवा या पितळी ताटात ठेवला जातो. भावेश्वरी आणि श्री रवळनाथाला गाऱ्हाणे घातले जाते. दिवा असलेले पितळी ताट गुरव उचलतात. तुळतुळीत डोक्यावर ठेवतात आणि यानंतरची १५ मिनिटे एक वेगळेच वातावरण तयार होते.मारूती गुरव हे डोक्यावरील आरती नेत होते. त्यांच्या पाठीमागे शस्त्रे घेतलेले पाच मानकरी असतात. आजूबाजुला देवस्थान समितीचे पदाधिकारी, पंचमंडळी असतात. गर्दीमध्ये ‘चांगभलं’च्या गजरामध्ये ही ‘डोक्यावरील आरती’पुढे जात असते.

मंदिराच्या पुढच्या बाजुला उपस्थित असलेल्या हजारो भाविकांचे हात जोडलेले असतात आणि तुळतुळीत डोक्यावर आरतीचे ताट घेवून मारूती गुरव हे आत्मविश्वासाने एकेक पाऊल टाकत असतात. तणावपूर्ण असे वातावरण यावेळी जाणवत असते. मात्र गेली अनेक वर्षे सुरु असलेली ही ‘डोक्यावरील आरती’ची प्रथा आजरा शहरामध्ये अजूनही जिवंत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीkolhapurकोल्हापूर