शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
4
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
5
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
6
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
7
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
8
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
9
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
10
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
11
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
12
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
13
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
14
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
15
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
16
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
17
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
18
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
19
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
20
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार

‘आपले सरकार केंद्र’ महाआयटीच्या ताब्यात, कारभार सुधारण्याची अपेक्षा

By समीर देशपांडे | Updated: June 21, 2024 17:19 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : नागरिकांना गावामध्ये विविध दाखले प्राप्त व्हावेत, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’चा कारभार ...

समीर देशपांडेकोल्हापूर : नागरिकांना गावामध्ये विविध दाखले प्राप्त व्हावेत, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’चा कारभार आता महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ’ महाआयटी या कंपनीच्यावतीने चालवण्यात येणार आहे. बुधवारी याबाबत शासन आदेश निघाला आहे.पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता आणि पारदर्शकता यावी, नागरिकांना विविध दाखले तातडीने मिळावेत, यासह एकाच केंद्रावर बँकिंगसह अन्य सेवा मिळाव्यात यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची स्थापना करण्यात आली. ११ ऑगस्ट २०१६ रोजी राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये या केंद्रांची स्थापना करण्यात आली आणि सीएससी, एसपीव्ही या केंद्र शासन प्रेरित कंपनीला हे काम देण्यात आले होते. यानंतर १४ जानेवारी २०२१ या शासन निर्णयानुसार या कंपनीला मुदतवाढ देण्यात आली.

परंतु, कामकाजातील अनियमितता, सॉफ्टवेअरच्या सुविधांच्या मर्यादा, केंद्र चालकांचे सातत्याने उशिरा दिले जाणारे मानधन, सेवा आणि प्रशिक्षणाबाबत शासनाकडे वारंवार लोकप्रतिनिधी, केंद्रचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या होत्या. यानंतर शासनाने तीन पत्र पाठवून या तक्रारींचे निवारण करण्याबाबत कंपनीला कळविण्यात आले होते.परंतु, याबाबत कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर १६ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय झाला. आता राज्य शासनाच्याच माहिती तंत्रज्ञान महामंडळ लि. या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.

वैशिष्ट्ये

  • कंपनीला प्रति केंद्र महिन्याला २,९५० रुपये देण्यात येतील.
  • कामाच्या प्रमाणात आणि केंद्रातील उपस्थितीनुसार केंद्र चालकांना अधिकाधिक १० हजार रुपये मानधन मिळेल.
  • दैनंदिन तक्रारींचे निराकरण कंपनीने करावयाचे असून, त्याची ग्रामविकास विभाग दखल घेणार नाही.
  • आपले सरकारवरील ४०० सेवा देणे.
  • रेल्वे, बसेस आरक्षणसह अन्य लोकोपयोगी सेवा देणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर