शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आपला दवाखाना’, कोल्हापुरात कसाबसा एक सुरू; बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 16:14 IST

दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली.

कोल्हापूर : ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ अशा शब्दात शासकीय कामाचे उपहासात्मक वर्णन केले जाते. शासकीय योजनांच्या बाबतीतही असाच अनुभव येतो. दीड वर्षापूर्वी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही सर्वसामान्यांसाठीची योजना सरकारने घोषित केली. या योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात १३ दवाखाने सुरू करायचे होते, त्यातील कसाबसा एक दवाखाना सुरू करण्यात आला. बाकीचे १२ दवाखाने अद्याप कागदावरच राहिले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे दवाखाने सुरू करण्यास विलंब झाला आहे. लवकरच पाच दवाखाने सुरू करत आहोत. जिल्हा परिषदेकडून औषध खरेदी करण्यात येणार आहे. औषधे खरेदी होऊन आमच्याकडे आली की हे दवाखाने सुरू केले जातील. या दवाखान्याकरिता लागणारे वैद्यकीय अधिकारी, नर्स यांच्यासह आवश्यक कर्मचारी यांची नियुक्तीही करण्यात आली आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक सुप्रिया देशमुख यांनी सांगितले.

१३ दवाखान्यांस मंजुरी, प्रत्यक्षात एकच सुरुकोल्हापूर शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १३ आपला दवाखाना सुरू करण्यास मंजुरी मिळाली होती. योजनेची घोषणा होताच सुरूवातीला पितळी गणपती मंदिराजवळील महापालिकेच्या जागेत एक दवाखाना सुरू करण्यात आला. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स तसेच अन्य कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या दवाखान्याची वेळ दुपारी २ ते रात्री १० अशी आहे.

‘लोकमत’ने केली पाहणीपितळी गणपती चौक : दुपारी तीन वाजतायाठिकाणी रोज २० ते २५ रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. कधी कधी अधिकाऱ्यांच्या बैठका असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिकडे जावे लागते. त्यांना अन्य जबाबदाऱ्याही दिल्या जातात. लॅब असिस्टंट दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत उपलब्ध असतात. दवाखाना ताराबाई पार्कमध्ये असला तरी बायोमेट्रिक हजेरी देण्यासाठी रोज दोनवेळा महापालिकेत जावे लागते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काही मिनिटे उशीर होतो. दवाखाना बंद करतेवेळी काही मिनिटे अगोदर जावे लागते.

आपला दवाखाना येथे चांगली औषधे दिली जातात. वेगवेगळ्या चाचण्याही केल्या जातात. त्यामुळे रुग्णांचा चांगला प्रतिसाद आहे. मृत्यू दाखला देण्याची जबाबदारी असते, त्यामुळे कधी कधी बाहेर जावे लागते. बैठकांनाही जावे लागते. परंतु, रुग्ण सायंकाळी पाचनंतर येत असल्याने तशी गैरसोय होत नाही. - डॉ. सुनीता पाटील वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल