शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

अस्वच्छतेच्या गराड्यात अंगणवाडी..!

By admin | Updated: July 4, 2015 00:01 IST

बालकांच्या आरोग्याला धोका : आटपाडी तहसील चौक परिसरात कचऱ्याचे ढीग

अविनाश बाड - आटपाडी -कचऱ्याच्या ढिगातून वाट काढत आणि जीवघेण्या दुर्गंधीत बसूनच आटपाडीच्या तहसील कार्यालयाजवळील अंगणवाडीतील मुले खाऊ खात आहेत. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने, ५० मुलांच्या या अंगणवाडीत आता २८ मुले उरली आहेत. बाहेरच्या घाणीत खेळा, नाही तर दिवसभर कोंडवाड्यातील जनावरांप्रमाणे कोंडून राहा... अशा अवस्थेत शिक्षण घेणाऱ्या दुर्भागी चिमुरड्यांच्या पालकांनी, ‘वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पुढाऱ्यांनो, १० मिनिटे या अंगणवाडीत नुसते थांबून दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा!’ असे बक्षीसच जाहीर केले आहे. येथील तहसील कार्यालयाच्या चौकाजवळ पूर्वेस शासकीय बचत भवनची इमारत आहे. या इमारतीच्या बाजूस शासकीय जनावरांचा दवाखाना आहे. जवळच बचत गटातील साहित्य विक्रीसाठी नवी इमारत बांधली आहे. तिथे विविध योजनांचे साहित्य ठेवले आहे. त्यामुळे या परिसरात सतत वर्दळ असते. या इमारतीच्या दक्षिणेस बचत धामच्या पाठीमागे प्रकाशवाडी नं. ४ ची अंगणवाडीची इमारत आहे. विशेष म्हणजे ९३ हजार ७५० रुपये एवढे जागतिक बँकेचे अनुदान मिळून २००२ मध्ये ही इमारत बांधण्यात आली आहे. या अंगणवाडीत दत्तनगरपासून गुलाल कलेक्शनपर्यंतच्या परिसरातील मुले येतात. या अंगणवाडीत पंखा आहे. पण विजेचे कनेक्शन नसल्याने मुलांसाठी ती एक शोभेची वस्तू ठरली आहे. अंगणवाडीच्या पूर्व दिशेस कुंपणाची भिंत आहे. बंद पडलेला हातपंप आणि कचरा आहे. इमारतीच्या दक्षिण बाजूस चिकटून बचत धामची बंद असलेली मोठी शौचालयाची टाकी आहे. या टाकीला, दोन मुले सहज आत जातील एवढी मोठी भोके आहेत. त्यातून विविध कार्यक्रमांतील शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ टाकत टाकल्याने ते कुजून त्याची दुर्गंधी पसरली आहे. टाकीशेजारी मोठा उकिरडा आहे. त्यावरील कचरा वाऱ्याने सगळ्या परिसरात पसरल्याने, तो खाण्यासाठी येणारी मोकाट जनावरे आणि डुकरांचा इथे सुळसुळाट झाला आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी ८-१५ दिवसांतून येऊन कचरा उचलण्याऐवजी, तो तिथेच जाळण्याचा पराक्रम करतात. कचऱ्याची राख पुढे ८-१५ दिवस अंगणवाडीच्या परिसरात उडत राहिल्याने मुलांची दाणादाण उडविते आहे. या दिशेहून मुले साचलेल्या कचऱ्यातून वाट काढतच अंगणवाडीत विद्यार्जनासाठी (?) येतात.अंगणवाडीच्या पश्चिम दिशेला बचतधाम इमारतीची मागील बाजू आहे. तिथे उघड्यावरील ‘स्वच्छतागृहा’ने दुर्गंधीत आणखीनच वाढ केली आहे. दक्षिण बाजूस जनावरांचाच दवाखाना आहे. त्यामुळे जनावरांची तपासणी आणि पुन्हा दवाखान्याच्या इमारतीच्या अडोशाने दुसरे उघडे स्वच्छतागृह बनले आहे. अशी चारीही बाजूंनी घाण असलेल्या ठिकाणी गेली १२ वर्षे अंगणवाडी सुरु (?) आहे. आटपाडी पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त आहे. पण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी आणि कारभाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.बिस्किटेही वादाच्या भोवऱ्यातजत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोषण आहाराप्रमाणेच अंगणवाडीतील लहान मुलांना दिली जाणारी बिस्किटेही चांगल्या प्रतवारीची व गुणवत्तेची नाहीत, कमी दर्जाची आहेत, निकृष्ट आहेत. तीही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.अंगणवाडीतील पोषण आहार कालबाह्य झालेला आहे. याची पंचायत समितीकडे तक्रार केली आहे. चौकशी करण्याचे आश्वासन दिले, पण त्यावर कोणतीही चौकशी झालेली नाही. कालबाह्य पोषण आहार परत घ्यावा, दुसरा द्यावा. - भैरु कांबळे,सामाजिक कार्यकर्ते, दरीबडचीपोषण आहाराबाबत तक्रार आल्यानंतर आम्ही संबंधित आहार पुरविणाऱ्या ठेकेदारांशी पत्रव्यवहार केला आहे. त्याने यापुढे आपल्याकडून अशी चूक होणार नाही, असे लिहून दिले आहे. पोषण आहार कालबाह्य झालेला नाही. तो आजही चालतो.- ए. आर. मडकेसहायक गटविकास अधिकारी