शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विसर्जन मिरवणूक महागात, सुतळी बॉम्ब उडाला डोळ्यात; तरुण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 12:24 IST

बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास गेला असता अचानक बॉम्ब उडाला

कोडोली : कोडोली (ता. पन्हाळा) येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये सुतळी बॉम्ब लवकर न उडाल्याने तो उडत का नाही पाहण्यास गेला असता अचानक बॉम्ब उडून डोळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने भारत संभाजी चव्हाण (वय २९), रा. देवाळे (ता. पन्हाळा) हा गंभीर जखमी झाला आहे. या ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेदरम्यान येथील शिवाजी चौकात घडली.याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोडोली येथे गुरुवारी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. चव्हाण याची सासुरवाडी कोडोलीत असल्याने तो पत्नीसह विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोडोलीत आला होता. चव्हाण हा आपल्या पत्नीसह मिरवणूक पाहत असताना मित्राच्या मंडळाची मिरवणूक शिवाजी चौकात आल्याने तो पत्नीस बाजूला थांबवून मिरवणुकीत सहभागी झाला.यावेळी लोखंडी पाइपमध्ये सुतळी बॉम्ब लावला होता, तो बराच वेळ उडाला नसल्याने बॉम्ब उडत का नाही म्हणून पाहण्यास तो गेला असता अचानक बॉम्ब उडाल्याने त्याच्या उजव्या डोळ्याला व डोक्याला मोठी दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला. ही दुर्घटना त्याच्या पत्नीसमोरच घडली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला यशवंत धर्मार्थ रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती गंभीर होऊ लागल्याने त्याला तातडीने कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanesh Mahotsavगणेशोत्सव