शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: धरणातून पाणी सोडल्याने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, अंथरुण धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 16:38 IST

कुटुंबियांच्या डोळ्यांदेखतच घडली दुर्घटना

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : धरणातून पाणी सोडल्याने वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीला अंथरुण धुवायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सोनगे (ता. कागल) येथील संजय आनंदा तोरसे (वय ४५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तोरसे हे मुळचे खडकेवाडा येथील असून सध्या सोनगे येथे राहत होते. या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे. ऐन यात्रेच्या तोंडावरच संजयची एक्झिट ग्रामस्थांना चटका लावणारी ठरली. ही घटना आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, सोनगे येथील यात्रा (म्हाई) दि.१५ रोजी आहे. त्यामुळे तोरसे आपल्या कुटुंबियासह बस्तवडे येथील बंधाऱ्याखाली अंथरूण धुण्यासाठी गेले होते. दरम्यान, धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तोरसे यांना पोहता येत होते. मात्र, पाण्याचा अधिक प्रवाह आणि भोवरा निर्माण झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पात्रामध्ये खोलवर गेले. त्यांच्या मुलांनी आरडाओरड केला. परंतू त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ते हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यात कर्मचारी होते. तोरसे हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्याच्या दुर्दैवी मृत्यूबाबत ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होत आहे‌. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.कुटुंबीयांच्या डोळ्यांदेखत मृत्यूप्रचंड कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर संजयने या कुटुंबाला दारिद्रयातून सावरले होते. तो नोकरी सांभाळून शेती, जनावरेही सांभाळत होता. आता कुठे आर्थिक घडी बसली होती. अन् काळाने संजयला हिरावून घेतले. त्यांना वाचविण्यासाठी काही तरुणांनी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे त्याच्या पर्यंत पोहचणे अशक्य झाले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू