शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तेरा टक्के नफा देतो म्हणाला अन् ३ कोटी रुपये हडपून बेपत्ता झाला; कोल्हापुरातील तरुणाचा २५ जणांना गंडा

By उद्धव गोडसे | Updated: September 12, 2023 13:06 IST

ना ऑफिस, ना फर्म

उद्धव गोडसेकोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा सहा ते १३ टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उत्तरेश्वर पेठेतील तरुणाने सुमारे तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दिली. अमोल नंदकुमार परांजपे (रा. उमरावकर गल्ली, उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. गुंतवलेली रक्कम परत मागण्याचा तगादा गुंतवणूकदारांकडून सुरू होताच संशयित परांजपे बेपत्ता झाला आहे.गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित अमोल परांजपे याने उत्तरेश्वर पेठ, शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ट्रेडिंगसाठी रक्कम दिल्यास त्यावर सहा ते १३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. जानेवारी २०२१ पासून त्याने गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चांगला परतावा देऊन, पुन्हा त्याच लोकांना जादा गुंतवणूक करण्यास त्याने सांगितले. यातून अनेकांनी त्याच्याकडे रोख रक्कम आणि धनादेशाद्वारे कोट्यवधी रुपये जमा केले.एप्रिल २०२३ पासून त्याने परतावे देणे थांबवले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत मिळवण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला; मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन लोकांचे पैसे देणे टाळले. संशयित परांजपे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने गेल्याच आठवड्यात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. २५ गुंतवणूकदारांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून, परांजपे याने आणखी चार साथीदारांच्या मदतीने तीन कोटी २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख त्यांनी तक्रार अर्जात केला आहे.ना ऑफिस, ना फर्मपरांजपे यांचे शहरात कुठेही कार्यालय नाही. ट्रेडिंग करण्यासाठी त्याची कुठली फर्मही नाही. मोबाइलचे रिचार्ज विक्रीतून त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. गुंतवणूकदारांच्या घरात जाऊन तो पैसे गोळा करीत होता, अशी माहिती गुंतवणूकदारांनी दिली.

गुंतवले सात लाख, मिळाले दोन लाख

एका गुंतवणूकदाराने परांजपे याच्याकडे सुरुवातीला एक लाख रुपये गुंतवले होते.वार्षिक ९६ टक्के परतावा मिळण्याच्या आमिषाने त्याने पुन्हा सहा लाख रुपये दिले. सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत त्याने सात लाख रुपये गुंतवले. त्याला दोन लाख रुपयांचा परतावा मिळाला. आता परतावे बंद होऊन मुद्दल अडकल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस