हातकणंगले : हातकणंगले ते लक्ष्मी औद्योगिक वसाहत रस्त्यावर मंगळवारी दुपारी भरधाव डंपर खाली उडी घेऊन किरण सुरेश कांबळे (वय ३५, रा. आंबेडकर नगर, उरूण इस्लामपूर, जि. सांगली) या युवकाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथील अवधूत टेक्सटाईल कारखान्यामध्ये डंपर क्र. (एम.एच ०९- ८७८८) जात असताना बलदेव टेक्सटाईल येथे हमालीचे काम करणारा किरण कांबळे याने अचानक डंपरच्या पाठीमागील चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या डोक्याचा चेंदामेदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच समर्थ रुग्णवाहिका चालक स्वप्नील नरुटे आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात हलविला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Kolhapur: डंपर खाली उडी घेऊन तरुणाने संपवले जीवन, हातकणंगले येथील धक्कादायक घटना -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:27 IST