शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

माऊली बघत होती मुलाची वाट, मात्र घराच्या माळ्यावरच.., कोल्हापुरातील मन हेलावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:54 IST

उत्कर्षा पोतदार उत्तूर : मुलगा दोन-चार दिवसांनी घरी येत होता, तो का आला नाही?  म्हणून आई त्याचा सर्वत्र शोध ...

उत्कर्षा पोतदारउत्तूर : मुलगा दोन-चार दिवसांनी घरी येत होता, तो का आला नाही?  म्हणून आई त्याचा सर्वत्र शोध घेत होती. तो गडहिंग्लज मध्ये एका हॉटेलमध्ये वेटर काम करायचा. आज येईल उद्या येईल या आशेवर माऊली वाट बघत होती. पण घराच्या माळ्यावरच मुलाने आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली होती. ही मन सुन्न करुन टाकणारी घटना घडलीय आजरा तालुक्यातील मुमेवाडी गावात. स्वप्निल शिवाजी भिऊंगडे (वय २७) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.स्वप्निल हा गडहिंग्लज मध्ये एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचा. दोन-चार दिवसांनी तो घरी येत होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून तो घरी आला नाही. त्यामुळे आई गावात, त्याच्या मित्रांकडे, गडहिंग्लजला चौकशी करायला सांगत होती.

दरम्यान, सोमवारी (दि.१९) घरी जेवायला बसल्यावर माळ्यावरून पाण्याचे थेंब व दुर्गंधी यायला लागली. भावाला बोलवून माळ्यावर जाऊन बघायला सांगितले. त्यावेळी माळ्यावरील तुळईला स्वप्निलचा मृतदेह लटकलेला आढळला. आशेने वाट बघत बसलेल्या आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह पाहताच आईने हांबरडा फोडला. आईचा हा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. वडिलांचे निधन झाल्याने तो आणि आई भाड्याच्या घरात राहत होते. त्याला एक विवाहित बहीण आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आईने त्याला घरी येत जा, आठ-आठ दिवस येत नाहीस, बोलत नाहीस, तुझी काळजी वाटते असे सांगितले होते.  या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. हेड कॉन्स्टेबल राजेश आंबुलकर पुढील तपास करीत आहेत.

कोरोना काळात बहुमोल मदत स्वप्नील सतत मित्रांबरोबर असायचा. कोरोना काळात मुमेवाडीतील कै. मुकुंदराव आपटे फाउंडेशनच्या कोरोना सेंटर मध्ये त्याने कोरोना पेशंटची निस्वार्थ सेवा केली होती. त्याच्या मृत्यूनंतर गावातील मित्रांच्या स्टेटसला त्याचे कौतुक करणारे मेसेज फिरत होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर