शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून गुंडाचा व्हिडिओ व्हायरल; कारागृह प्रशासनाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर

By उद्धव गोडसे | Updated: December 21, 2023 14:19 IST

कारागृहात खुनातील आरोपीकडे मोबाइल कसा? 

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कळंबा कारागृहातील एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कळंबा कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कारागृह प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.राजेंद्रनगर येथील गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये टाकाळा येथे चौघांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. त्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अमर माने याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.यातील टोळीप्रमुख अमर माने याचे कारागृहातील काही फोटो आणि त्यावरून तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध असून, एक लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहेत. थेट कळंबा कारागृहात दबदबा निर्माण केल्याचा आणि विरोधकांना चिथावणी देणारा मजकूर यातून व्हायरल केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या काही तरुणांनी हे व्हिडिओ स्टेटसला लावले आहेत.

या प्रकारामुळे कळंबा कारागृहात कैद्यांकडून राजरोसपणे मोबाइल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कारागृह प्रशासनाला विचारणा केली असता, फोटो आणि व्हिडिओची तपासणी करून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिका-यांनी दिली. संबंधित फोटो कळंबा कारागृहातील नसावेत, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. मात्र, या प्रकाराने खळबळ उडाली असून, कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगPoliceपोलिस