शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सापडले कोंबडीचे भले मोठे अंडे, देशातील सर्वात मोठे अंडे असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 16:37 IST

१०० ते १५० ग्रॅम पर्यंत वजनाची अंडी आतापर्यंत बहुदा सर्वत्र आढळतात

दिलीप चरणेनवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील दिलीप महादेव चव्हाण यांच्या पोल्ट्रीतील एका कोंबडीने चक्क २१० ग्रॅम वजनाचे भले मोठे अंडे देऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. आपल्या पोल्ट्रीतील कोंबडीने एवढे 'मोठे अंडे' दिलेले पाहून पोल्ट्री मालक अवाक् झालेत. या अंड्याची रेकॉर्ड बुक नोंद होण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. हे अंडे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.तळसंदे येथील दिलीप चव्हाण यांची तळसंदे - वारणानदी रस्त्याला चव्हाण मळा येथे कोंबड्यांची पोल्ट्री आहे. गेली ३८ वर्षे ते या पोल्ट्री व्यवसायात असल्याने कोंबडी व अंडी या विषयांची त्यांना चांगलीच जाण आहे. काल रविवार रात्री एका कोंबडीने एक मोठे अंडे दिल्याचे दिलीप चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या नजरेत इतके मोठे अंडे पहिल्यांदाच पाहायला मिळाले. त्यांनी प्रथम मोजपट्टीच्या साह्याने या अंड्याचे मोजमाप घेतले. इतर अंड्यांशी त्याची तुलना केली. त्यानंतर त्यांनी इतर अंडीही मापून पाहिलीत. तथापि हे अंडे मोठे असल्याने त्यांनी त्याचे वजन केले.लिम्का बुक ऑफ रेकोर्ड नुसार आजपर्यंत भारतात जास्तीत जास्त १६२ ग्रॅम तर जागतिक स्तरावर ५०० ग्रॅम चे अंडे आढळून आले आहे. पोल्ट्री व अंडी व्यवसायातील तज्ञांच्या मतानुसार भारतात १०० ते १५० ग्रॅम पर्यंत वजनाची अंडी आतापर्यंत बहुदा सर्वत्र आढळतात. त्यांनी त्यांच्या पोल्ट्रीत आढळलेल्या अंड्याचे वजन केले तर ते रविवारी रात्री २०० ग्रॅम तर तेच अंडे आज सोमवारी दुपारी २१० ग्रॅम भरले. हवामानाच्या बदलामुळे दहा ग्रॅमचा फरक पडला असल्याचे मत दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. हे देशातील कोंबडीचे सर्वात मोठे अंडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर