शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
3
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
4
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
5
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
6
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
7
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
8
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
9
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
10
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
12
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
13
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
15
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
16
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
17
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
18
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
19
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
20
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कागलला सव्वादोन किलोमीटरचा उड्डाण पूल, वाहतूक कोंडी कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:02 IST

महामार्गाच्या चौपदरीकरणात कागल येथे अनेक त्रुटी राहिल्या होत्या

सतीश पाटील कोल्हापूर : कागल येथील शाहू साखर कारखान्याचा माळ बंगला ते कागल चेकपोस्टपर्यंत २ किलोमीटरचा २४७ मीटरचा पिलरचा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ६०० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. हा उड्डाणपूल कसा असणार याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच सादरीकरण करण्यात आले आहे.या २४७० मीटरपैकी १९७५ मीटरचा उड्डाण पूल ५५ मीटरच्या अंतरावर ३६ ते ४० पिलरवर उभारणार आहे. रुंदी २५ मीटर असणार आहे. कोल्हापूरच्या दिशेने २७५ मीटर आणि बंगळुरूच्या दिशेने २२० मीटर शेवटचा उतार असणार आहे. २००६ साली महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यावेळी महामार्गाच्या चौपदरीकरणात कागल येथे अनेक त्रुटी राहिल्या होत्या. महामार्गामुळे कागलचे पूर्व-पश्चिम असे विभाजन झाले असून, येथील जनतेलासुद्धा याचा त्रास होत होता. साखर कारखाने सुरू झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूककोंडी हा प्रश्न खूप मोठा होता. गेली २० वर्षे कागलवासीयांना आणि आसपासच्या गावांना मोठा त्रास झाला आहे. कित्येक अपघात याठिकाणी झाले. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. कित्येकजण कायमचे जायबंदी झाले. वाहतूक कोंडी तर नित्यनेमाने होत होती, म्हणूनच कागलच्या जनतेने याठिकाणी पिलरवरचा उड्डाण पूल उभारण्यात यावा, अशी मागणी केली होती, ती पूर्णत्वास येत आहे.कणकवली आणि कराड येथे उभारलेल्या पिलरच्या उड्डाण पुलाप्रमाणे कागल येथेही तसाच उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. कोल्हापूर-बंगळूरु महामार्गावरील कागल शहर हे औद्योगिकदृष्ट्या, तसेच व्यापारीदृष्ट्या वेगाने विकसित होत आहे मात्र, वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आणि रहदारीच्या अनियमिततेमुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. विशेषतः बस स्थानक परिसर, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर रोज मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी असते.

५५ मीटरकागल येथील चेकपोस्ट नाका ते कोर्टापर्यंत उभारला प्राणात उडाण पूल हा ३६ ते ४० पिलरवर उभारण्यात येणार आहे. या पिलरमधील अंतर सुमारे ४५ मीटर असणार आहे. या उड्डाणपुलामुळे  कोंडी कमी होऊन कागलकरांना दिलासा मिळणार आहे.कागलसह जवळच्या गावांना होणार लाभकागल शहर, कसबा सांगाव सुळकूड, मौजे सांगाव ही गावे, मुख्य बाजारपेठ, एस.टी. स्टँड शाळा, हे पूर्व बाजूला, तर सर्व प्रशासकीय कार्यालये पश्चिम बाजूला आहेत, सर्व खासगी रुग्णालये, साखर कारखाने पश्चिम बाजूला, मुरगूड आदमापूर, सिद्धनेली, राधानगरी या गावांना जाणारा मार्ग पश्चिम बाजूला यामुळे रस्ता ओलांडून आणे अवघड होते. जे छोटे भुयारी मार्ग आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. ही कोंडी आता कमी होईल.

कसरत कमी होणारकागल येथे जिल्ह्यातील मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. हजारो कामगार याठिकाणी रोजगारासाठी येतात. या औद्योगिक ये वसाहतीत जायचे असेल तर पूर्व बाजूपासून पश्चिम आणि पुन्हा पश्चिम बाजूवरून पूर्वेला कसरत करत यायला लागते. उडाणपुलामुळे हा त्रास वाचणार आहे.

बास्केट ब्रीजचाही 'डीपीआर' झाला तयार

  • सातारा-कागल महामार्गावर कागल शहरात उडाणपूल उभारण्याची मागणी होत होती. त्यानुसार या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या उडाण पुलासह भरावाऐवजी पिलर टाकून पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • त्या पुलाचा तसेच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या बास्केट ब्रीजचा 'डीपीआर तयार केला आहे. या डीपीआर'नुसारचा निधी उपलब्धतेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे येत्या १५ दिवसांत सादर केला जाणार आहे.

महामार्ग चौपदरीकरण कामात ज्या त्रुटी राहिल्या त्या सहापदरीकरण कामात राहू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहोत, कागल शहराजवळील उड्डाण पूल कराडच्या धर्तीवर भरावाऐवजी पिलरचा व्हावा यासाठी मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली कृती समितीने संघर्ष केला. - प्रताप ऊर्फ भय्या माने, अध्यक्ष-कृती समिती, कागल 

कागलना पिलरचा उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. आता महापुराची तीव्रता कमी होवून वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री

पिलरच्या उड्डाण पुलामुळे कागलच्या नागरिकांसह शहरात ये-जा करणा-या सर्वांची सोय होणार आहे. वाहतूक सुटसुटीत होऊन प्रवाशांना फायदा होणार आहे. कागलच्या विकासाच्या दृष्टीने ही अत्यंत चांगली बाब आहे - आनंदराव दा. पाटील, निक्षा व्यावसायिक, कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गkagal-acकागलTrafficवाहतूक कोंडी