शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: विशाळगडाचा बुरुज पुन्हा ढासळला; शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 17:57 IST

पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरीलगडी बुरुज पुन्हा ढासळला. सध्या विशाळगडावर सुरु असलेल्या संततभार पाऊसामुळे हा बुरूज ढासळला. पुरातत्व विभागाकडे दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पायथ्यालगतच्या दरीवरील लोखंडी शिडीनजीकचा दगडी बुरूज अतिवृष्टीमुळे गत जुलै महिन्यात ढासळला होता. विशाळगडावर दोन मार्गाने जाता येते. एक मार्ग लोखंडी शिडीचा, तर दुसरा शिवकालीन पायरी मार्ग आहे. शिडी मार्गानेच पर्यटक जातात. लोखंडी शिडीपासून अवघ्या काही अंतरावरील हा बुरूज पुन्हा ढासळला. पावसाळ्यापूर्वी शिवप्रेमींनी पुरातत्त्व विभागाकडे विशाळगडाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. मात्र पुरातत्त्व विभागाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने हा बुरुज पुन्हा ढासळला असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जात आहे.राज्य शासनाने गड, किल्लेसंवर्धन मोहिमेंतर्गत विशाळगडासाठी निधी मंजूर केला होता. या निधीमधून गडावर  डागडुजीसह अनेक कामे केली जाणार होती. बुरूज, तटबंदीतील झाडेझुडपे, गवत काढून तसेच जमिनीखाली गाडलेले दगड उत्खनन करून पूर्वेकडील चार बुरुजांची डागडुजी करण्यात आली. मात्र, कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने बुरूज ढासळू लागले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगड