शहरं
Join us  
Trending Stories
1
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
2
दुहेरी हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगर हादरलं; दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून हत्या
3
हे साफ खोटं, ही FAKE NEWS आहे...; 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा असं का म्हणाली? प्रकरण काय
4
३ तास समजावल्यानंतरही, सासूचे मत बदलले नाही, होणाऱ्या जावयाकडेच राहणार; मुलीच्या लग्नाआधी झाली होती फरार
5
IPO आणण्याच्या तयारीत PhonePe, नावही बदललं; भारतात लिस्टिंगच्या तयारीला वेग
6
“...म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले”; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, सांगितली Inside Story
7
सगळी भांडणं मिटवतो, पण आधी शपथ घ्या की...; 'मनसे' युतीसाठी उद्धव ठाकरेंनी बंधूंसमोर ठेवली एक अट!
8
ठाकरे बंधू एकत्र येणार?; आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचं सांगत राज ठाकरेंकडून युतीसाठी टाळी!
9
सुप्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत झालेला फरार, नेमकं प्रकरण काय?
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
11
तमन्ना भाटियासारखं फिट आणि सुंदर दिसायचंय? अभिनेत्रीने सांगितलेला सीक्रेट डाएट प्लान करा फॉलो
12
Anaya Bangar Boy to Girl Transition Story: संजय बांगरचा मुलगा का बनली मुलगी? 'ट्रान्सजेंडर' Anaya Bangar ने सगळंच सांगून टाकलं...
13
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'या' दिवशी ६ तासांसाठी बंद राहणार!
14
FD vs SIP: कोणता पर्याय ठरू शकतो बेस्ट, फायदा-तोट्याचं गणित समजून घ्या
15
“मराठीला हिंदी नाही तर गुजरातीपासून सर्वाधिक धोका”; संजय राऊतांची मनसे, भाजपावर टीका
16
Tarot Card: सुरवंटाचे फुलपाखरू होण्याचा काळ, प्रयत्नात कुचराई नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!
18
Maharashtra Politics : इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध? हे कसं चालतं ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल
19
प्रेमाचा जांगडगुत्ता! मुलीच्या सासऱ्यासोबतच ममता झाली फरार; महिलेच्या पतीला दुःख अनावर
20
५ वर्षांपूर्वी मृत्यू झालेला 'तो' रिक्षा चालवताना सापडला; पत्नीशी WhatsApp वर चॅटिंग, अखेर...

Kolhapur: ‘गडहिंग्लज’चा मास्टर प्लॅन बनवून कालबद्ध कार्यक्रम हवा, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अपेक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:17 IST

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल मार्गी लावावे

राम मगदूमगडहिंग्लज : विधानसभेच्या निवडणुकीत सहाव्यांदा निवडून आलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पुन्हा वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे गडहिंग्लजकरांच्या अपेक्षा खचितच वाढल्या आहेत. त्यांनी कागलच्या धर्तीवर गडहिंग्लजचा विकास करावा, अशा शहरवासीयांच्या अपेक्षा आहेत. आज (मंगळवार) ते गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त शहरातील प्रलंबित मागण्या ठककपणे पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा केली जात आहे.१५ वर्षांपूर्वी गडहिंग्लज शहराचा समावेश कागल मतदारसंघात झाला. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळाली. परंतु, ‘कागल’सारखा गडहिंग्लज शहराचा विकास झालेला नाही, अशी शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करासांगाव व उत्तूरप्रमाणे गडहिंग्लजमध्येही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय करावी.

गडहिंग्लज शहरातील प्रलंबित प्रश्न

  • मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी आजरा रोडवरील पशुचिकित्सालयाशेजारील जागा आरक्षित आहे. त्याठिकाणी ही इमारत बांधून प्रांतकार्यालयासह सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणावीत.
  • प्रांत कचेरीची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून नगरपालिका कार्यालयाची सध्याची इमारत आणि वाचनालयाची इमारत मिळून जळगाव महानगरपालिकेच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधून गडहिंग्लज पालिका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवावी.
  • प्रलंबित रिंगरोडचे काम मार्गी लावून वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा.
  • वाढती लोकसंख्या विचारात घेऊन स्मशानभूमीचा विस्तार करून विद्युतदाहिनीची सुविधा उपलब्ध करावी. खुल्या जागा विकसित करून भाजीपाला-फळविक्री केंद्रे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, बगीचे इत्यादी सुविधा वाढवाव्यात. महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधावीत.
  • गडहिंग्लज बाजार समिती आवारातील रस्त्यांची पुनर्बांधणी करून कृषीपूरक उद्योग-व्यवसाय बाजार समितीला ऊर्जितावस्था द्यावी.
  • बेघरांसाठी शहरात घरकुल योजना राबवावी.
  • नगरपालिकेच्या नियोजित नाट्यगृहाला भरीव निधी मिळवून द्यावा.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफ