शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वाघबीळ घाटात भरधाव कार शंभर फुट दरीत कोसळली, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:57 IST

सरदार चौगुले - कोल्हापूर -रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या धोकादायक दुसऱ्या वळणावर कोल्हापूरकडे जाताना चारचाकी गाडीच्या चालकाला वळण समजले ...

सरदार चौगुले -कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या धोकादायक दुसऱ्या वळणावर कोल्हापूरकडे जाताना चारचाकी गाडीच्या चालकाला वळण समजले नाही, यामुळे भरधाव कार शंभर फुट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याची नोंद लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

इम्रान मुशताक सुंडके (वय ३९), महमहअली नुरअहमद बिजापूर (वय ३२), इम्रान शरीफ बागवान (वय २४), शाकिर मुन्ना कितुर (वय २६, सर्वजण रा.हुबळी जि.धारवाड) अशी चौघा जखमींची नावे आहेत. लक्ष्मीपूरीतील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरील सर्व जखमी कर्नाटक राज्यातील हुबळी येथील असून ते विशाळगडला देवदर्शनासाठी गेले होते.रविवारी पहाटे विशाळगडहून गावाकडे येत असताना पाचच्या सुमारास वाघबीळ घाटातील उतरणीची दुसऱे वळण चालकाच्या लक्षात आले नसल्याने ताबा सुटलेली चारचाकी गाडी थेट दरीत कोसळली.गाडी झाडावर आदळत खाली दरीत गेल्याने चेपली आहे.सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेली नाही.जखमींना खाजगी रूग्नवाहिकेतून कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.

संरक्षक कटडा असता तर… -वाघबीळ घाटाच्या दुसऱ्या वळणावरील संरक्षक कटडा तुटून दहाबारा वर्ष झाले आहे.याच ठिकाणी दरम्यानच्या काळात चारवेळा गाड्या दरीत जाऊन अपघात झाले आहे.सुरक्षेच्या दृष्टीने या धोकादायक जागी संरक्षक कटडा बांधलेला नाही की बॅरेकेटस् लावलेले नाही.वाघबीळ घाटात ठिकठिकाणी संरक्षक कटडे ढासाळलेल्या अवस्थेत आहे.याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे.या ठिकाणी संरक्षक कटडा असतातर गाडी कटड्यामुळे दरीत गेली नसती.अशी चर्चा घटनास्थळी होती. 

 

टॅग्स :Accidentअपघातcarकारhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर