शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

वादग्रस्त प्रार्थनास्थळ जमीनदोस्त, कोल्हापुरातील हेरले गावाला पोलिस छावणीचे स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 15:37 IST

हिंदुत्ववादी संघटनांनी वादग्रस्त वरील जागेवर धार्मिक प्रार्थनास्थळ बांधकाम सुरु आहे ते तात्काळ थांबवावे अशी मागणी केली 

हातकणंगले : हेरले (ता. हातकणंगले) येथील संजयनगर माळभाग येथील गट नं. ४४५ / २३ ग्रामपंचायत मिळकत नं. ३२४९ या स्वमालकीच्या मिळकतीमध्ये असलेले  प्रार्थनास्थळ महसूल आणि पोलिस प्रशासनाने मंगळवारी सकाळी जमीनदोस्त केले. यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.हेरले येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावलेला शुभेच्छा डिजिटल फलक २४ एप्रिलला रात्री एका अज्ञात समाजकंटकाने फाडल्याची घटना घडली. त्यामुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेने हिंदुत्ववादी संघटनांनी गाव बंद ठेवून जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन या वादग्रस्त जागेवर धार्मिक प्रार्थनास्थळाचे बांधकाम सुरू असून, ते तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली. जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला तत्काळ आदेश देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीने २८ एप्रिलला नोटीस देऊन मंजुरीपेक्षा जादा असलेले ५८ चाैरस मीटर बांधकाम तत्काळ काढून घ्यावे असे सांगितले, तर तहसीलदार हातकणंगले यांनी वादग्रस्त गट नं. ४४५/२३ मधील बिगरशेती प्लॉटमधील बांधकाम बिगरपरवाना आहे ते बंद करावे, बांधकाम काढून टाकावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम ५२ (१) सह कलम ४३ अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा व खटला दाखल करण्याची नोटीस २७ एप्रिल रोजी देऊन २४ तासांत कारवाई करू अशी नोटीस बजावली. वैयक्तिक गट नंबरमधील अर्धवट स्लॅबला आलेले आर.सी.सी. बांधकाम मंगळवारी २ मे राेजी धार्मिक प्रार्थनास्थळ असल्याच्या तक्रारीवरून तीन जे.सी.बी., दोन डंपर, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या दोनशे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विरोध मोडून काढत प्रशासनाने जमीनदोस्त केले. या कारवाईमध्ये हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, निवासी तहसीलदार दिगंबर सानप, सात पोलिस अधिकारी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा सहभागी झाला होता; या वादग्रस्त बांधकाम पाडण्याच्या ठिकाणी, पत्रकार, ग्रामस्थ यांच्यासह कोणासही जाण्याची परवानगी दिली नव्हती.

पोलिस ठाण्याकडून सलाेखा बैठकसंजयनगर येथील वादग्रस्त गट नंबरमधील प्रार्थनास्थळ बांधकामाबाबत १ मे रोजी सकाळी हेरले केंद्रशाळेमध्ये शांतता, बंधुभाव, जातीयता सलोखा राहावा यासाठी हातकणंगले पोलिस ठाण्याने सामाजिक सलोखा बैठक आयोजित केली होती. यावेळी इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खारमोटे यांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवावा, असे ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्यासह हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी या शांतता बैठकीस उपस्थित होते.प्रेस नोट काढू - तहसीलदार हेरले येथील गट नंबरमधील वादग्रस्त बांधकाम पाडल्याच्या कारवाईबाबत तहसीलदार कल्पना ढवळे यांना दोन ते तीन वेळा प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणे टाळले. ‘प्रेस नोट काढू,’ एवढेच उत्तर दिले.

हेरले येथील गट नंबर ४४५ / २३ हा २ / ३ / १९८२ मध्ये बिगरशेती झालेला तहसीलदार लेआऊट मंजुरीचा प्लॉट आहे. ग्रामपंचायत ठराव ५ / ३९ ने १७ जानेवारी २३ ला १४६६८ रुपये बांधकाम परवाना शुल्क भरून बांधकाम परवाना घेतला आहे. आर.सी.सी. इमारत अद्याप पूर्ण नाही. स्लॅब पडलेला नसताना प्रार्थनास्थळ ठरवून प्रशासनाने २३ लाखांचे बांधकाम जुलमी पद्धतीने जमीनदोस्त केले आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागणार आहे. - बालेचाँद जमादार, जागामालक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस