शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महाविद्यालयीन तरुणाला जोगता सोडण्याचा कार्यक्रम हाणून पाडला, गडहिंग्लज तालुक्यातील अजब प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:18 IST

अंनिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले समुपदेशन

नेसरी : गडहिंग्लज तालुक्यातील एका ऐतिहासिक गावातील तरुणाचा मानदुखीचा त्रास कमी होईना म्हणून काही लोकांच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेमुळे जोगता म्हणून सोडण्याचा कार्यक्रम अंनिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. हा प्रकार जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आला. विशेष म्हणजे संबंधित तरुण त्याच गावातील एका वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात शिकत आहे.अधिक माहिती अशी, पीडित तरुणाचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्याचा मोठा भाऊ मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. गेली एक-दोन वर्षे पीडित तरुणाला मानदुखीचा त्रास सुरू आहे. जुजबी उपचार केल्याने तो कमी झाला नव्हता. त्याला आजारपणातून मुक्तता मिळावी म्हणून या संबंधित कुटुंबाने त्याला काही देवाचे तर झाले नाही ना ? यासाठी चुकीच्या मार्गाने प्रयत्न केले असता काही देवर्ष्यांनी त्या तरुणाला यल्लमा देवीला जोगता म्हणून सोडण्याचा अजब सल्ला दिला. त्यानुसार त्या तरुणाला देवीला जोगता सोडण्याच्या विधिवत कार्यक्रमाची तयारी या कुटुंबाने सुरू केली.या प्रकाराची कुणकुण समाजातील काही जाणकार तरुणांना समजली. त्यांनी गडहिंग्लज अंनिस व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना कळविले. कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला याची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ या कुटुंबाला पोलिस स्टेशनमध्ये आणले.वरिष्ठ अधिकारी, पोलिस व कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाशी चर्चा करून असा प्रकार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून त्याच्यावर चांगले वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देत त्यांचे समुपदेशन करून असा काही कार्यक्रम करणार नसल्याचे लिहून घेतले. संबंधित मुलाच्या वडिलांनीही हा प्रकार गैरसमज व अंधश्रद्धेतून झाल्याचे सांगितल्याने यावर पडदा पडला.

देवदासी, जोगता प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केला आहे. बेकायदेशीररीत्या मुला-मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करण्यास बंदी असतानाही केवळ अंधश्रद्धेतून असे प्रकार घडतात. विज्ञान युगात काहींच्या चुकीच्या सांगण्यावरून असे हिडीस प्रकार घडतात ही आश्चर्यांची बाब आहे.- प्रकाश भोईटे, राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र अंनिस 

आजारपणाच्या मुक्ततेसाठी पीडित तरुणाला देवीच्या सेवेसाठी, जोगता म्हणून सोडायला पाहिजे अशी भीती भोंदूनी घातल्यानेच हे कुटुंब या थराला आले. मात्र, त्याचवेळीच समुपदेशन झाल्याने त्या तरुणाची मुक्तता झाली. जाणकार तरुणांचे अभिनंदन. - प्रा. सुभाष कोरे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर