शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे स्पष्ट बहुमत.. तरीही राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार; सुप्रिया सुळेंची महायुती सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 14:14 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले. मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा घोळ संपलेला नाही. सरकार गतिमान ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती सरकारला स्पष्ट बहुमत दिले. मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा घोळ संपलेला नाही. सरकार गतिमान नाही. केवळ देवेंद्र फडणवीस एकटेच काम करीत आहेत. राज्यात ‘वन मॅन शो’ कारभार सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी केली.त्या म्हणाल्या, महायुतीच्या सरकारमध्ये समन्वय नाही. सरकार येऊन ६० दिवस झाले तरी अजूनही सर्व मंत्री कामाला लागलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा. केवळ निवडणुकीचा जुमला होता म्हणून वेळे मारून नेऊ नये. पीकविमा, हार्वेस्टरच्या अनुदानातील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेमध्ये विचारणार आहे. याचे पुरावे गोळा करीत आहे.

चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आले..खासदार सुळे म्हणाल्या, ईव्हीएम यंत्रासंबंधी मतदारांमध्ये संभ्रम आहे. माझी निवडणूकही या यंत्रावर झाली तरी मतदारांचा ईव्हीएमवरील विश्वास उडालेला आहे. कागल, चंदगडमध्ये आता निवडून आलेल्यापेक्षा आमच्या उमेदवार किती तरी पटीने चांगल्या, सुसंस्कृत होत्या. काही तरी करून दाखवण्याची उमेद त्यांच्यामध्ये होती. पण वेगळीच हवा खाऊन आलेले आमदार झाले.

सोन्याचे रस्ते व्हायला हवे होते..महायुतीला कोल्हापूरने चांगले यश दिले. सरकार स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत कोल्हापूरचे रस्ते सोन्याचे व्हायला हवे होते. सोन्याचे राहू दे, चांदीचे तरी करा, असाही टोला खासदार सुळे यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSupriya Suleसुप्रिया सुळेMahayutiमहायुती