शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

By संदीप आडनाईक | Updated: December 7, 2023 18:14 IST

कोल्हापूर : चार एकर स्लॅबची मर्यादा बदलून आठ एकर करा, सातबारावरील चिकोत्रा प्रकल्पासाठी राखीव जमीनीचा शेरा रद्द करा, राष्ट्रीय ...

कोल्हापूर : चार एकर स्लॅबची मर्यादा बदलून आठ एकर करा, सातबारावरील चिकोत्रा प्रकल्पासाठी राखीव जमीनीचा शेरा रद्द करा, राष्ट्रीय महामार्गामधील भूसंपदानत बाधित शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तसेच मालमत्तेचे फेरसर्वेक्षण करा यासह पेरण्या न झालेल्या ठिकाणी भरपाई द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक शेतकरी गुरुवारी काेल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.विविध मागण्यांचे फलक हातात घेउन ताराबाई पार्क येथून चालत निघालेल्या करवीर, कागल, चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील चारशेहून अधिक शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत तेथेच त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी किसान संघाचे प्रांत सदस्य आर. डी. चौगले, जिल्हाध्यक्ष ॲड. यशवंत खानविलकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ शिंदे यांनी भाषणे केली. या मोर्चात कागल तालुक्यातील धनाजी खराडे, जावेद देसाई, आर. डी. पाटील, प्रकाश पाटील, अमित लुगडे, चंद्रकांत तहसिलदार, पांडू पानसरे, करवीर तालुक्यातील राजेश पाटील, देव पाटील, लक्ष्मण पाटील, सरदार निरुखे, अभिजित पाटील, तानाजी पाटील, मधुकर पाटील, सुनील पाटील, बाजीराव पाटील, तानाजी चौगुले येथील शेतकरी सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी निवेदन स्विकारले.

फलकाद्वारे वेधले लक्ष

प्रस्तावित एनएच १६६ महामार्गामधील भूसंपादनात मौजे भुये, भुयेवाडी, किणी येथील शेतकऱ्यांच्या बाधित पाईपलाईनचा तसेच नुकसान होत असलेल्या घरे, झाडे, विहिरींचे फेरसर्वेक्षण करावे,मौजे आलाबाद, गलगले येथील कागल तालुक्यातील चिकोत्रा प्रकल्पांतर्गत अन्यायी ठरलेली चार एकर स्लॅबची मर्यादा तातडीने बदलून ती पुन्हा ८ एकर करावी, चिकोत्रासाठी राखीव जमीन अशी सातबारावरील शेरा रद्द करावी अशा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांकडेही शेतकऱ्यांनी फलकाद्वारे लक्ष वेधले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारीMorchaमोर्चा