शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

kolhapur: घुंगूर येथे ताटातूट झालेल्या बिबट्या अन् पिल्लाची झाली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 13:02 IST

करंजफेण : शाहुवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या हद्दीत सोमवारी सकाळच्या दरम्यान बिबट्याची मादी अन् बिबट्याच्या पिल्लाचे नागरिकांना दर्शन झाले. नागरिकांच्या ...

करंजफेण : शाहुवाडी तालुक्यातील घुंगूर गावच्या हद्दीत सोमवारी सकाळच्या दरम्यान बिबट्याची मादी अन् बिबट्याच्या पिल्लाचे नागरिकांना दर्शन झाले. नागरिकांच्या भीतीने बिबट्याची मादी जंगलात पळाल्याने मागोमाग असलेले तीन महिन्यांचे पिल्लू बिथरून जवळच असलेल्या झुडपात लपून बसले. नागरिकांनी घटनेची माहिती वनविभागाला देताच कर्मचाऱ्यांनी पिल्लाला ताब्यात घेतले. अन् बिबट्या अन् पिल्लाची भेट घडवून दिली.आठ दिवसांपूर्वी घुंगूर गावाजवळील बांदिवडे गावात बिबट्याने दोन वेळा प्रवेश करून घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. नागरिकांनी वनविभागाला बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती. दरम्यान सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घुंगूरवाडीतील काही युवक पहाटेच्या दरम्यान फिरायला गेल्यावर शाळेजवळील रस्त्यावरून बिबट्याची मादी पिल्लांच्यासोबत जात असल्याचे दिसून आले. बिबट्याच्या मादीला नागरिकांचा सुगावा लागल्याने मादीने जवळच असलेल्या जंगलात धूम ठोकली. मात्र बिबट्याचे पिल्लू मागे राहिल्याने रस्त्याच्या शेजारी असलेल्या झुडपात पिल्लू बसले.स्थानिक नागरिकांनी बिबट्याचे पिल्लू असल्याची माहिती वनरक्षक अतुल कदम यांना देताच कदम यांनी तातडीने घटनास्थळी येऊन सहकाऱ्यांच्या मदतीने बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेऊन लोखंडी सापळ्यात सुरक्षित ठेवले आहे. तीन महिने वयाचे हे होते. पिल्लाला सापडलेल्या परिसरात रात्री सुरक्षित ठेवण्यात आले. यानंतर माती बिबट्या पिल्लास घेवून गेली. यावेळी परिसरात चार कॅमेरे लावण्यात आले होते. यावेळी वनपाल राजाराम रसाळ, वनरक्षक अतुल कदम वनसेवक दिनकर पाटील, महेश पाटील, नामदेव पाटील, सुरेश बुक्कम, स्वप्नाली जाधव उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्या