शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबाच्या पहिला खेट्याला भाविकांची मोठी गर्दी, चांगभलंचा अखंड गजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:34 IST

जोतिबा : वाडी रत्नागिरी येथे चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्याला सुरुवात झाली. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र , ...

जोतिबा : वाडी रत्नागिरी येथे चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्याला सुरुवात झाली. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र , कर्नाटक राज्यातील भाविकही श्रद्धेने खेट्यात सहभागी होतात. रविवारी पहिल्या खेट्याला जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गाय मुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले होते, जोतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. चांगभलंचा गजर डोंगरावर घुमत होता. रविवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले, सकाळी ८ ते ९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती, दुपारी ३ ते ४ अभिषेक, रात्री पालखी सोहळा झाला. स्थानिक पुजारी, ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती.दरम्यान, रविवारी पहिल्या खेट्यादिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री जोतिबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा गुरव समाज आणि देवस्थान समितीच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्याबरोबर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव, आनंदा लादे, नवनाथ लादे, धैर्यशील तिवले, हेमंत भोरे, आदी उपस्थित होते.खेट्याची आख्यायिका कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असे पायी प्रवासाने रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा