शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News- बेडकाचे लावले लग्न, गाढवावरून काढली वाजत गाजत मिरवणूक; पावसासाठी 'या' गावात अनोखी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 12:47 IST

पावसाने दडी मारली, मृगनक्षत्र ही कोरडे गेले

उत्कर्षा पोतदार उत्तूर : उत्तूर येथे वळीव पावसाने दडी मारली,  त्यानंतर मृगनक्षत्र ही कोरडे गेले. त्यामुळे ऊस पिके वाळली, भाताची पेरणी पावसा अभावी खोळंबली, विहिरी, धरणे कोरडी पडली आहेत. सर्वत्र पाण्याविना नागरीकांचे हाल होत आहेत. ते दूर करण्यासाठी नागरिकांनी बेडूक व बेडकीचे लग्न लावून त्यांची गाढवावरून मिरवणूक काढली.   रोहिणीचा पेरा कोरडा गेला, मृग नक्षत्र ही वाया गेले. परंतु पावसाचा एक थेंब नाही. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने पावसाला साकडे घालण्यासाठी उत्तूर मध्ये बेडूक व बेडकीचे लग्न लावण्यात आले. त्यासाठी एका पातेल्यामध्ये बेडूक व बेडकी ठेवून त्यांना हळद-कुंकू लावून त्यांचे लग्न लावण्यात आले.नंतर गाढवाला तेल लावून गरम पाण्याने अंघोळ घालण्यात आली. त्या गाढवाच्या पाठीवर बेडूक व बेडकी ठेवलेले पातेले ठेवून गावातील प्रत्येक देवळात पानविडा ठेवून व नारळ फोडून पावसासाठी देवी देवतांना साकडे घालण्यात आले. ज्या ठिकाणाहून मिरवणूक काढली त्याच ठिकाणी मिरवणूक आणून हे गाऱ्हाणे पुर्ण केले. 

 यावर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवत आहे. उत्तूरमध्ये नदी नसल्याने पाण्यासाठी लोक घागरी घेऊन गल्लोगल्ली फिरत आहेत. अजून आठवडाभर जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ सदृश्य स्थिती होईल. पाऊस पडण्यासाठी पारंपारिक पद्धतीने बेडूक व बेडकीचे लग्न लावून गाढवावरून त्यांची मिरवणूक काढतात. - जगदीश हावळ  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस