शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्सचा तब्बल ८०० कोटींचा गंडा; फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट

By उद्धव गोडसे | Updated: July 14, 2025 13:35 IST

एकूण गुंतवणूक, किती कोटींचे दिले परतावे.. वाचा सविस्तर

उद्धव गोडसेकोल्हापूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीने सुमारे पाच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची ८०० कोटींची फसवणूक केल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमधून स्पष्ट झाले. कंपनीच्या कागदपत्रांची आणि संगणकीय पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी पूर्ण झाली असून, अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांकडे सादर केला.कंपनीने एकूण २४७६ कोटींची गुंतवणूक घेऊन त्यावर १६०० कोटींचे परतावे दिल्याचेही तपासातून समोर आले. फॉरेन्सिक अहवालामुळे तपासाला आणखी गती येणार असून, तक्रारी दिलेल्या गुंतवणूकदारांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता वाढली आहे.

एएस ट्रेडर्स कंपनीसह तिच्या संलग्न कंपन्या, संचालक आणि एजंट यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या व्याप्तीसह पद्धत समजून घेण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना फॉरेन्सिक ऑडिटचा निर्णय घेतला होता. त्यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून फॉरेन्सिक तपासणीची मंजुरी घेतली. त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली.गेल्या दीड वर्षांपासून मुंबईतील तज्ज्ञांकडून गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट सुरू होते. याचा अहवाल नुकताच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाला. या अहवालानुसार कंपनीने डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधित महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे पाच हजारांहून जास्त गुंतवणूकदारांकडून २,४७६ कोटी रुपये जमा करून घेतले. यातील १,६०० कोटी रुपये परताव्यांच्या रूपाने परत दिले. ८०० कोटी रुपये हडप करून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

फॉरेन्सिक ऑडिटमधील निष्कर्ष

  • एकूण गुंतवणूकदार : ५ हजार
  • एकूण गुंतवणूक : २,४७६ कोटी
  • दिलेले परतावे : १,६०० कोटी
  • झालेली फसवणूक : ८०० कोटी
  • गुंतवणूकदारांच्या तक्रारी : ५९५