आजरा : आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शंकर धाकू माडभगत (वय-३८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, शंकर माडभगत हे हे आपल्या शेतातील झाडाच्या फांद्या तोडत होते. यावेळी झाडाची फांदी विद्युतप्रवाहीत ३३ के.व्ही. लाईनवर पडली. दरम्यान माडभगत यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. माडभगत यांच्या मृत्यूची माहिती समजताच गावावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील व एक अपंग अविवाहीत बहीण, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
आजऱ्यातील धनगरमोळा येथे शॉक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:17 IST