शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात एका कुटुंबाने एक-दोन नव्हे ४० मांजरे पाळली, शेजारी त्रस्त; कारवाईदरम्यान एका कर्मचाऱ्याला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:02 IST

महापालिकेकडून मांजरे जप्त, दोन ट्रॉली कचरा काढला, वादावादीमुळे तणाव

कोल्हापूर : रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले, त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी नियमबाह्यपणे पाळलेली तीन मांजरे महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने बुधवारी जप्त केली. मांजरे पाळून स्वच्छता न केल्याने साठलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटल्याची तक्रार रहिवाशांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी एका मांजराने महापालिका कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतला. उर्वरित दहा ते बारा मांजरे पळून गेली. मात्र, मांजरामुळेचा आणि इतर असा एकूण दोन ट्रॉल्या कचरा बुलबुले यांच्या घरातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.महापालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलबुले यांना मांजरे पाळण्याची आवड आहे. त्यांच्याकडे पूर्वी ३५ पेक्षा अधिक मांजरे होती. मात्र, अलीकडे ती कमी कमी होत दहा ते बारा राहिली होती. घरात मांजरांना रोज घातलेल्या खाद्याचे अवशेष, त्यांचे मल, मूत्र, घरगुती दैनंदिन कचरा अनेक दिवसांपासून घरात साठून राहिल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. याचा त्रास झाल्याने रहिवाशांनी पहिल्यांदा पोलिस ठाण्यात धाव घेतली.तेथून तक्रार महापालिकेकडे आल्यानंतर महापालिकेने बुलबुले यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. मात्र, त्यांनी घरातील स्वच्छता ठेवली नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी पथक घरात पोहोचले. घरात जाऊन कचरा भरताना आणि मांजरे पकडताना विरोध झाला. यामुळे कर्मचारी आणि बुलबुले कुटुंबीय यांच्यात वाद झाला. यातूनही तीन मांजरे पकडून ती जप्त केली. उर्वरित मांजरे पळून गेल्यामुळे जप्त करता आली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, नंदकुमार पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, सूरज घुणकीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जप्त मांजराचे पुढे काय ?जप्त केलेली तीन मांजरे महापालिकेच्या कुत्रे निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आली आहेत. बुलबुले कुटुंब सर्व नियम पाळून मांजरे पाळण्याची हमी दिली तर जप्त तीन मांजरे त्यांना परत करण्यात येणार आहेत.