शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आता दूरशिक्षण केंद्रातून घेता येणार ‘दुहेरी पदवी’, विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 12:45 IST

ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे.

कोल्हापूर : नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरशिक्षण पद्धतीने दुहेरी पदवी घेण्याची सुविधा शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ (दूरशिक्षण) आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत दिली जाणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. डी. के. मोरे यांनी गुरुवारी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत आयोजित केलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या बैठकीत डॉ. मोरे बोलत होते. यावेळी उपकुलसचिव डॉ. एन. जे. बनसोडे, सी. ए. कोतमिरे, आदी उपस्थित होते.विद्यापीठ अनुदान आयोगाने दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या सर्व बी.ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. (गणित) आणि एम.बी.ए. अशा एकूण बारा अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्ये संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच वेळी पदविका आणि पदवी, अथवा दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होता येणार आहे.

ही संधी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या अभ्यासक्रमापासून लागू आहे. यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही निवड करता येईल. विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यांवर असणार नाही, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली.अभ्यासक्रम प्रत्यक्ष उपस्थितीतून पूर्ण करता येईलदोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थितीच्या माध्यमातून पूर्ण करू शकतील. एक अभ्यासक्रम प्रत्यक्ष वर्ग उपस्थिती आणि दुसरा अभ्यासक्रम मुक्त (ओपन) किंवा दूरशिक्षणातील अथवा ऑनलाईन स्वरूपातीलही असू शकतो. दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईनही किंवा मुक्त अथवा दूरशिक्षण पद्धतीतीलही असू शकतात, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ