शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: गुंतवणूकदारांना ७५ लाखांची फसवणूक, दाम्पत्य तीन महिन्यांपासून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:57 IST

अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता

कोल्हापूर : शेअर्स मार्केट, कमोडिटी मार्केट ट्रेडिंग व्यवसायात जादा परताव्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने ७५ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. प्रसाद विनायक धर्माधिकारी, अश्विनी प्रसाद धर्माधिकारी (दोघेही रा. मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर) अशी फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत.या प्रकरणी विजय नामदेव पोळ (वय ५३, रा. बी वॉर्ड, जवाहरनगर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली. दाम्पत्य गेल्या तीन महिन्यांपासून पसार झाले असून, फसवणुकीचा आकडा कोट्यवधीत जाण्याची शक्यता आहे.जुना राजवाडा पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा हा प्रकार २ डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२५ पर्यंत घडला आहे. संशयितांचे मंगळवार पेठेत एंजल ब्रोकिंग शेअर्स मार्केट आणि कमोडीटी मार्केट ट्रेडिंग नावाचे कार्यालय आहे. दोघेही हा व्यवसाय चालवितात. फिर्यादी आणि त्याचे दोन भाऊ चंद्रकांत, रमेश यांना शेअर्स मार्केट आणि कमोडीटी मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखविले. पहिले काही दिवस त्यांना वेळेवर परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिघा पोळ बंधूंनी ९५ लाख रुपये इतकी रक्कम गुंतवणुकीसाठी दिली. या रकमेवर १९ लाख १० हजारांची रक्कम परतावा म्हणून दिली. मात्र, त्यातील उर्वरित ७५ लाख ९० हजारांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गेल्या सहा महिन्यांपासून फिर्यादी त्याच्याकडे गुंतवणूक केलेली रक्कम परत मागत होते; मात्र आरोपींनी भूलथापा मारून काही दिवसांनी देतो, असे सांगितले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून तो पत्नीसह फरार झाला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोळ यांनी फिर्याद दाखल केली.

सोलापुरात चौकशीआरोपी दाम्पत्य तीन महिन्यांपासून पसार झाले आहे. त्यांच्या मंगळवार पेठेतील घरी आई, वडील राहतात. प्रसाद धर्माधिकाऱ्याच्या पत्नीचे माहेर सोलापूर आहे. पोलिसांनी सोलापूर येथे संपर्क साधला. मात्र, त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आले होते. मात्र, सध्या ते कोठे गेले याची माहिती नसल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.

१२ वर्षांपासून व्यवसायातधर्माधिकारी पती-पत्नी गेल्या बारा वर्षांपासून एंजल ब्रोकिंगचा अधिकृत सबब्रोकर आहेत. अनेक ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांनी गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले. सुमारे दीड ते दोन कोटी रुपये त्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केले आहेत. मात्र, त्याचा परतावा वेळेवर दिला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सामान्य नागरिकही गुंतवणूकदारमोठ्या गुंतवणूकदारांपासून ते अगदी हातगाडीवाले, फूलविक्रेते, वडापाव विक्रेते, किराणा दुकानदार अशा हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य लोकांनाही त्याने गंडा घातला आहे.

तक्रारदारांची संख्या वाढणारअन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अशोक दळवी, ऋषिकेश पाटील, स्वप्निल टिकारे, योगेश पोतदार यांच्यासह सुमारे दहा ते बारा जणांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. सुमारे ५० गुंतवणूकदारांची फसवणूक केली असल्याची शक्यता काही जणांनी पोलिसांसमोर व्यक्त केली आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कर्जाची रक्कम शेअर मार्केटमध्येधर्माधिकारी हा एका बँकेचा बीसी पॉइंट चालवीत होता. त्या माध्यमातून त्याने ग्राहकांना कर्ज वितरित करून तीच रक्कम शेअर मार्केटमध्ये वळविली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.