शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur | कोल्ड ड्रिंक्स घेऊन जाणारा कंटेनर उलटला, शीतपेयांच्या बाटल्यांसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 09:12 IST

अपघातात चालक, वाहक जखमी; शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

दीपक मेटील, लोकमत न्यूज नेटवर्क, सडोली (खालसा): कोल्हापूर राधानगरी रोडवरील पिरवाडी (ता. करवीर) नजीकच्या वळणावर भोगावतीहून कोल्हापूरकडे शीतपेय घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रामलिंग सिंग (वय ३०) आणि गुरसिंग (वय २२) रा. इंदोर अशी जखमींची नावे असून हा अपघात शनिवारी पहाटे झाला आहे. या ट्रकमध्ये असणाऱ्या शीतपेयाच्या बाटल्यांचे भरलेले बॉक्स नेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व वाहन चालकांची झुंबड उडालेली दिसली.

अधिक माहिती अशी की, गोव्याहून कोल्हापूरकडे शीतपेय घेऊन जाणारा ट्रक पिरवाडी (ता. करवीर) नजीक शनिवारी पहाटे तंदूर हॉटेलच्या वळणावर चेस तुटल्याने पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हर व क्लीनर हे दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ट्रकमध्ये असणारे शीतपेयाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. ते नेण्यासाठी वाहनचालकांची, परिसरातील नागारिकांची अक्षरशः गर्दी झाली. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर