दत्तवाड : व्हॉटसअपवर स्टेटस ठेवून दत्तवाड (ता. शिरोळ) येथील महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धार्थ सुभाष जाधव (वय २२) असे या युवकाचे नाव आहे. सिद्धार्थने घराजवळील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, गुरुवारी पहाटे उघडकीस आली. सिद्धार्थ हा बारावी पास झाला असून पुढील शिक्षणासाठी त्याने प्रवेश घेतला होता. मात्र रात्री दोन वाजता व्हॉटसअपवर स्टेटस ठेवून त्याने पहाटे आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.ही घटना आज सकाळी उघडकीस येताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतचा तपास बीट अंमलदार अनिल चव्हाण करीत आहेत.
कोल्हापूर: रात्री दोन वाजता व्हॉटसअपवर स्टेटस ठेवला, अन् गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:38 IST