शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: इचलकरंजीत कापड व्यापाऱ्याची सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, खिशात आढळली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 15:37 IST

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

इचलकरंजी : येथील पाटीलमळा-नारायण मळा परिसरातील अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन एका कापड व्यापार्‍याने आत्महत्या केली. ओमप्रकाश शंकरलाल शर्मा (वय ४२ रा. स्वामी अपार्टमेंट जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. शर्मा यांच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरात राहणारे ओमप्रकाश हे कापड खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते शनिवारी सकाळी ९ वाजता ते सांगली रोडवरील पाटीलमळा-नारायण मळा परिसरात असलेल्या प्रेमकमल रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये गेले होते. सात मजले असलेल्या अपार्टमेंटच्या गच्चीवर जावून त्यांनी थेट खाली उडी मारली. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.मोठा आवाज झाल्याने अपार्टमेंटमधील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती. या घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. तेथे नातेवाईकांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. शर्मा यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. मात्र त्यामध्ये आत्महत्येचे कारण नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी