शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य सांगते म्हणून भोंदूगिरी करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश, कोल्हापुरातील घटना; 'अंनिस'कडून स्टिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 11:15 IST

दीड हजार रुपये प्रवेश शुल्क व उपचार करण्यासाठी २५ हजार तसेच गुण आल्यास आणखी २५ हजार रुपये असा दर

कोल्हापूर : चेहऱ्याकडे पाहून तुमचे भविष्य सांगते, तुमच्या अडचणी दूर करते, असे सांगून दीड हजार रुपये प्रवेश शुल्क व उपचार करण्यासाठी २५ हजार तसेच गुण आल्यास आणखी २५ हजार रुपये असा दर सांगणाऱ्या एका भोंदू महिलेचा पर्दाफाश गुरुवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे केला.त्यांना शाहूपुरी पोलिसांची मदत झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही या कारवाईस बळ दिले. सृष्टी राजेश मोरे (वय ४०, रा. प्लॉट नंबर ९३४/११ शाहूपुरी कुंभार गल्ली) असे महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी सांगितले, येथील शाहूपुरी कुंभार गल्लीत ही महिला आपण ज्योतिषशास्त्रात पारंगत असल्याचे सांगून लोकांना विविध आमिषे दाखवत होती. अतिंद्रिय शक्ती भूतबाधा यांच्यासाठी उपाययोजना करून देणे. त्यासाठी होम-हवन करून देते, असे दावे तिने केले होते. त्याबद्दलची तक्रार ‘अंनिस’कडे आली होती.त्याची दखल घेऊन अंनिसच्या कार्यकर्त्या गीता हसूरकर त्यांच्याकडे गेल्या. पीडित बाई म्हणून सीमा पाटील यांना नेले. त्यांनी आपले नातेवाईक म्हणून महिला पोलीस व पुरुषांस सोबत नेले. त्यावेळी महिलेचा चेहरा बघून डोळ्यात बघून मनातले ओळखणे, फोन नंबरवरून भविष्य सांगणे, बसलेल्या जागेवर तुमच्या घरी काय आहे, काय नाही, तुमच्या घरातली मानसिक स्थिती कशी आहे? आर्थिक स्थिती कशी आहे? कोणत्या घरात जास्त पसारा आहे वगैरे सांगत असताना संशयित सृष्टी मोरेला पकडून दिले.शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिच्यावर महाराष्ट्र नगबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा नोंदवला.

गारा, लिंबू, कवड्या केल्या जप्त

तिच्या घरी अंगारा, धुपारा, अंगावरून उतरून टाकण्याच्या वस्तू, नारळ, लिंबू, लिंबूला खोचलेल्या लवंगा, त्याचबरोबर एका पुडीमध्ये उडीद कापूर व झाडांच्या मुळ्या तसेच कवड्या, जोतिषशास्त्राचे पुस्तक, असे साहित्य जप्त केले.

जिल्हा प्रशासनाची मदत...

या प्रकरणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे या कामाला उभारी मिळाली. त्यांनी लोकांना जागृत करण्यासाठी कामाला लागा, असे सांगितले. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही मोलाची मदत केल्यामुळे हे स्टिंग ऑपरेशन यशस्वी झाल्याचे सीमा पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी