शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

Accident: देवदर्शनाला जाताना हुक्केरी जवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू, तीघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 19:37 IST

सौंदत्ती येथे देवदर्शनाला निघालेल्या मुरगुड येथील भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला.

मुरगूड : सौंदत्ती येथे देवदर्शनाला निघालेल्या मुरगुड येथील भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार समोर आलेल्या कुत्र्याला चुकवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील ताबा सुटून कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हुक्केरी जवळ हा भीषण अपघात झाला.यात संजय जयसिंग चौगले (वय ५७ ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी तिघांवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हुक्केरी पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.अधिक माहिती अशी की, मुरगूड येथील सेवानिवृत्त पशु वैद्यकीय अधिकारी संजय जयसिंग चौगले, त्यांच्या पत्नी सविता चौगले, नातलग विजया सदाशिव सूर्यवंश-पाटील व अनिल ज्ञानदेव गुजर हे चौघे चौगले यांच्या खासगी गाडीतून (गाडी नंबर MH ०९ CM 5822 ) सौंदत्ती येथे देवदर्शनाला निघाले होते. सकाळी सहा वाजता ते मुरगूड मधून बाहेर पडले. आठ ते नऊ च्या सुमारास हुक्केरी जवळ त्यांच्या कारचा अपघात झाला. यावेळी कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळून वीस ते पंचवीस फूट बाजूला तीन ते चार वेळा पलटी झाली. यात गाडीचा चक्काचुरा झाला.अपघातानंतर तेथील नागरिकांनी तात्काळ जखमींना हुक्केरी येथील रुग्णालयात दाखल केले. दोन्ही महिलांनी आपला पत्ता सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क झाला. दरम्यान उपचारा पूर्वीच चौगले यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुरगूडमधून नातवाईक हुक्केरीमध्ये पोहचल्यानंतर जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात