शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी घेतली दहा हजारांची लाच, कोल्हापुरात जीएसटी विभागातील कर निरीक्षक अटकेत

By उद्धव गोडसे | Updated: September 5, 2023 17:42 IST

कोल्हापूर : जीएसटीची रक्कम मुदतीत भरली नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम परिसरातील व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची ...

कोल्हापूर : जीएसटीची रक्कम मुदतीत भरली नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम परिसरातील व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेणारा जीएसटी विभागातील कर निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. विशाल बाबू हापटे (वय ३५, रा. हातकणंगले) असे अटकेतील संशयित कर निरीक्षकाचे नाव आहे. कसबा बावडा येथील जीएसटी भवनमध्ये मंगळवारी (दि. ५) दुपारी ही कारवाई झाली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉकी स्टेडियम परिसरातील टायर विक्रेत्याकडून जीएसटीची रक्कम भरणे प्रलंबित होते. याबद्दल कारवाई करण्याचे टाळण्यासाठी जीएसटी विभागातील कर निरीक्षक विशाल हापटे याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर पथकाने मंगळवारी दुपारी जीएसटी भवान येथे सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना हापटे याला पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली. अटकेतील हापटे याची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBribe Caseलाच प्रकरण