शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

विवाह समारंभातील किरकोळ कारणावरून पै-पाहुण्यात तुंबळ हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 22:53 IST

वादातूनच आज तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला.

अमर मगदूम राशिवडे : मामा, भाचा आणि भाचे जावई यांच्यात शुक्रवारी राशिवडेतील गोठण परिसरात तुंबळ हाणामारी झाली.  विवाह स्थळासंदर्भात जावयाने विचारणा केल्याच्या व त्याला नको ते उत्तर दिल्याने बुधवारी वाद झाला होता. या वादातूनच आज तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला. यामध्ये एक मामा जखमी झाला असून त्यांच्यावर कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या हाणामारीची चर्चा सोशल मीडिया व चौका चौकातून खुमासदारीने होत आहे

राशिवडे येथील मामाच्या मुलग्याचा विवाह समारंभ बुधवारी झाला. घराच्या दारातच सर्व कार्यक्रम पार पडले. मात्र विवाह स्थळ अन्यत्र ठेवले होते. याबाबत चौकशीसाठी सरवडेच्या भाचे जावयांनी मामेभाऊला फोन केला. त्यावेळी 'मरतुकीचे ठिकाण माणसं शोधून काढतात, तुला लग्नाचा पत्ता सापडत नाही व्हयं..?' असे उत्तर दिल्याने भाचे जावई अपमानित झाले. ही गोष्ट त्यांनी आपल्या मेहुण्याच्या कानावर घातली. याचा जाब भाच्याने मामाला लग्नाच्या जेवणावळीतच विचारला. त्यामुळे किरकोळ कारणाचा वाद वाढत गेला. यामधून एका मामाने भाच्याला कानशिलात मारली. ते भांडण सोडविताना भाचे जावयालाही प्रसाद मिळाला.याचा राग मनात धरून भाचा व भाचे जावई यांनी शुक्रवारी दोन गाड्यातून आपले सहकारी मित्र आणून एका मामाची चांगलीच धुलाई केली. यामध्ये मामा जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत कोल्हापूरचे सरकारी रुग्णालय किंवा राधानगरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर