शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

किल्ल्यावर आकाशकंदील लावताना शॉक बसून मुलाचा मृत्यू, कोल्हापुरात घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:49 IST

दिवाळीच्या तोंडावर झेंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

कोल्हापूर : अंगणात तयार केलेल्या किल्ल्याची शोभा वाढविण्यासाठी लायटिंगची माळ आणि आकाशकंदिल लावताना शॉक बसल्याने वेदांत सुधीर झेंडे (वय १२, रा. कणेरकर नगर, कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दिवाळीच्या तोंडावर वेदांत याचा चटका लावणारा मृत्यू झाल्याने झेंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.सीपीआरच्या अपघात विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, कणेरकर नगर येथील सुधीर झेंडे हे बंगळुरू येथील एका कंपनीत मॅनेजरपदी नोकरी करतात. त्यांची पत्नी, दोन मुले आणि आई कणेरकर नगरातील घरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा वेदांत याने अंगणात किल्ला तयार केला आहे. गुरुवारी सायंकाळी तो किल्ल्यावर लायटिंगची माळ आणि आकाशकंदिल लावत होता.त्यावेळी लायटिंगच्या माळेतून त्याला शॉक बसला. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी वेदांत याच्या आईला बोलवून विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने वेदांत याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये दाखल करताच उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.हसता-खेळता मुलगा क्षणात दगावला!नोकरीनिमित्त बंगळुरू येथे असलेले सुधीर झेंडे यांना दुर्घटनेची माहिती दिली असून, ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. हसता-खेळता मुलगा काही क्षणात दगावल्याने वेदांत याच्या आईला धक्का बसला. त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू