शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उतरले १४६ आसनी मोठे विमान, विमानतळाच्या इतिहासातील पहिली घटना

By संतोष.मिठारी | Updated: November 22, 2022 18:43 IST

नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान विमानतळावर उतरले

कोल्हापूर : येथील विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज, मंगळवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी १४६ आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूरविमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले.स्टार उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या उद्योगक्षेत्रातील कामानिमित्त हे मोठे विमान कोल्हापुरात आले. एमब्ररर ई१९५-ई२ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान १४६ आसनी आहे. त्यात प्रवासी नव्हते. दुपारी साडेचारच्या सुमारास या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. त्यामुळे एअरबस सारखी विमाने कोल्हापुरात उतरण्यास आणि येथून उड्डाण करण्यास येथील धावपट्टी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.दरम्यान, यापूर्वी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते एम्ब्रेर लेगसी ६५० या जेट इंजिन असलेल्या विमानाने आले होते. कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्षमतेचे विमान उतरले होते.

कोल्हापूर विमानतळावरून दि. १३ नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे तिरूपतीला जाणाऱ्या विमानाचे रात्रीच्यावेळी उड्डाण झाले. त्यानंतर आज १४६ आसनांचे एअरबसला समकक्ष असणारे विमान उतरले. त्यावर आता विमानतळाची धावपट्टी अशी मोठी विमाने उतरण्यास योग्य, पूरक आणि विमानतळावरील सुविधा सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. -अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानAirportविमानतळ