करवीर तालुक्यात ९७ मिलिमीटर पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:50+5:302021-06-18T04:17:50+5:30
कोपार्डे - करवीर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. कुंभी, भोगावती, तुळशी, पंचगंगा व कासारी नद्यांच्या पाणी ...

करवीर तालुक्यात ९७ मिलिमीटर पावसाची नोंद
कोपार्डे - करवीर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. कुंभी, भोगावती, तुळशी, पंचगंगा व कासारी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पाचही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.
करवीर तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. सरासरी ९७ मिलिमिटर गेल्या २४ तासांत पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असल्याने तालुक्यात असणाऱ्या दहा पैकी नऊ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यात सांगरुळ, कोगे, शिंगणापूर, राजाराम, बहिरेश्वर, आरे, बाचणी, हळदी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शिंगणापूर व राजाराम हे बंधारे मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी वापरले जातात. पण बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. इतर बंधाऱ्यावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने सुरू आहे
१७ कुंभी नदीपात्र
फोटो
कुंभी नदीचे पाणी मुसळधार पावसामुळे पात्राबाहेर पडले आहे.