शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

६ कोटींचा दंड.. तरी सिग्नल तोडण्यात नाही खंड; कोल्हापुरात वाहतुकीचे तीनतेरा 

By पोपट केशव पवार | Updated: May 28, 2025 19:31 IST

पोलिस नसले की, नियमांना विचारतो कोण?

पोपट पवार

कोल्हापूर : वेळ दुपारी सव्वा एकची..स्थळ गजबजलेला व्हीनस कॉर्नर चौक.. सिग्नल सुरू होण्यास अजून ४० सेकंदांचा अवधी असताना, दोघे थेट सिग्नल तोडून पुढे गेले, तर तिघा-चौघांनी ज्या बाजूने सिग्नल सुरू आहे, तिकडे चुकीच्या मार्गाने जात शॉर्टकटचा पर्याय निवडला. एका-एका सिग्नलाला प्रत्येक एक-दीड मिनिटाला चार-पाच वाहनधारक वाहतून नियमांचे उल्लंघन करून स्वत:सह दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र कोल्हापूर शहरात पाहायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या १६ महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९५ हजार जणांना तब्बल ६ कोटी २३ लाख ३ हजार ९०० रुपयांचा दंड करूनही वाहनधारक ‘हम नही सुधरेंगे’चाच प्रत्यय देत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.कोल्हापूर शहरात ३९ सिग्नल आहेत. यातील ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, सीपीआर चौक, फोर्ड कॉर्नर या सिग्नलवर वाहनांची प्रचंड गर्दी असते. सिग्नल पडला की ४० ते जास्तीत जास्त ८० सेकंदांपर्यंत थांबण्याची काहींची तयारी नसते. त्यामुळे शहरातील बहुतांश सिग्नलवर सिग्नल तोडून, शॉर्टकटचा मार्ग पत्कारून वाहनधारक वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत.पोलिस नसले की, नियमांना विचारतो कोण?दाभोळकर कॉर्नरचा चौक हा सर्वात रहदारीचा चौक आहे. मंगळवारी दुपारी येथे एकही वाहतूक पोलिस नव्हता. त्यामुळे वाहनधारकांकडून सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन सुरू होते. याच चौकात शहरातील पहिला स्मार्ट सिग्नल बसवला आहे. लांबच्या वाहनांनाही तो सिग्नल स्पष्टपणे दिसतो.

व्हीनस कॉर्नरलाही नियमांना हरताळव्हीनस कॉर्नर चौकात पाच ठिकाणी रस्ते मार्ग आहेत. त्यामुळे लवकर जाण्याच्या नादात येथेही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. कोंडाओळकडून आलेले अनेक वाहनधारक सिग्नलची वाट पाहण्यापेक्षा मधूनच दसरा चौकाच्या रस्त्याला येऊन पुढे स्टेशनरोडकडे मार्गस्थ होतात. मात्र, यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे.दृष्टीक्षेपात दंड१ जानेवारी २०२४ ते ३० एप्रिल २०२५ या १६ महिन्यांच्या कालावधीत ९५ हजार ७७२ वाहनधारकांनी सिग्नल तोडणे, लायसन्स जवळ न बाळगणे, ट्रिपल सिट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर, असे विविध नियम तोडले आहेत. अशा वाहनधारकांना शहर वाहतूक पोलिसांनी ६ कोटी २३ लाख ३ हजार ९०० रुपयांचा दंड केला आहे.

सर्वाधिक केसेस कोणत्या

  • नो पार्किंग-२४७०३
  • लायसन्स नसणे -१६९४२
  • सिग्नल तोडणे-३७६७
  • प्रवेश बंदीतून वाहन चालवणे-९५३८

 

  • कोल्हापूर शहरातील सिग्नल : ३९
  • शहर वाहतूक पोलीस-८२

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी विविध उपाययोजना, जनजागृती करण्यावर आमचा भर आहे. पुढच्या काळात सिग्नल तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहोत. - नंदकुमार मोरे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस