जिल्हा बँकेच्या प्रारूप यादीवर ९५ हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:31+5:302021-09-14T04:29:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : काेल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप यादीवर सोमवारपर्यंत ९५ हरकती दाखल झाल्या आहेत. या ...

जिल्हा बँकेच्या प्रारूप यादीवर ९५ हरकती
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काेल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रारूप यादीवर सोमवारपर्यंत ९५ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतीवर गुरुवारी (दि. १६) विभागीय सहनिबंधक अरुण काकडे हे सुनावणी घेणार आहेत. सुनावणीनंतर २७ सप्टेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, विभागीय सहनिबंधकांनी ७६४७ संस्थांच्या प्रतिनिधींच्या नावाची मतदार यादी ३ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली. या यादीवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. सोमवारी हरकती दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या कालावधीत ‘विकास संस्था’, ‘प्रक्रिया संस्था’, ‘बँका, पतसंस्था’ व ‘इतर संस्था’ या चार गटांतून ९५ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवर गुरुवारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे हे सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर २२ जुलैला हरकतींचा निकाल देऊन २७ सप्टेंबरला ते अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत.
दुबार, वादाच्या हरकतीवर सुनावणी
प्रारूप मतदार यादीवर ९५ हरकती आल्या असल्या तरी दुबार व वादाच्या हरकतीवरच सुनावणी घेतली जाणार आहे. नावात बदलासह इतर हरकती कागदपत्रांची पडताळणी करून केल्या जाणार आहेत.
अशा झाल्या हरकती :
गट क्रमांक १- ३९
गट क्रमांक २-१७
गट क्रमांक ३- १६
गट क्रमांक ४- २३
एकूण - ९५