९३० नवे रुग्ण, ३५ मृत्यू, ९६३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:39+5:302021-05-05T04:38:39+5:30
गेले दहा दिवस सलग रुग्णसंख्या वाढत असून, मृतांचा आकडाही कमी येत नसल्याने प्रशासनाची काळजी वाढतच आहे. कोल्हापूर शहरात २२९ ...

९३० नवे रुग्ण, ३५ मृत्यू, ९६३ कोरोनामुक्त
गेले दहा दिवस सलग रुग्णसंख्या वाढत असून, मृतांचा आकडाही कमी येत नसल्याने प्रशासनाची काळजी वाढतच आहे. कोल्हापूर शहरात २२९ नवे रुग्ण आढळले असून, त्याखालोखाल करवीर तालुक्यामध्ये १४८ नवे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ३५ मृतांमध्ये इतर जिल्ह्यांतील पाचजणांचा समावेश आहे.
गेल्या २४ तासांत २०१७ जणांची तपासणी करण्यात आली असून, २८६३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. १३५० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, ९५९२ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
चौकट
कोल्हापूर शहरातील ११ जणांचा मृत्यू
कोल्हापूर शहरातील ११ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये कसबा बावडा येथील तीन, शिवाजी पेठेतील दोन, संभाजीनगर येथील दोन, नाना पाटील नगर, कोरे गल्ली, कदमवाडी आणि ताराबाई पार्क येथील प्रत्येकी एकजण यांचा समावेश आहे.
इचलकरंजी ०७
कारदगे माळभाग, गोसावी गल्ली, कृष्णानगर, नदीवेस नाका, सुतार गल्ली, सुतार मळा आणि इचलकरंजी
शिरोळ ०३
शिरटी, शिरोळ, अब्दुललाट
करवीर ०५
कुरुकली, पाचगाव, निगवे दुमाला, केर्ली, देवाळे
हातकणंगले ०२
तारदाळ, पेठवडगाव
पन्हाळा ०१
कळे
शाहूवाडी ०१
करंजोशी
इतर जिल्हे ०५
अनंगसवल विजापूर, औसा वांगी लातूर, शिराळा सांगली, मिरज, अकलूज
चौकट
सकाळची माेकळीक अडचणीची
राज्य शासनानेच सकाळी ७ ते ११ या कालावधीत नागरिकांना मोकळीक दिल्यामुळे याच काळात मंडई आणि बाजारामध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी गर्दीत खरेदी करायची आणि दिवसभर घरात बसायचे. यातूनही कोरोना वाढत असल्याचे निरीक्षण असून, याबाबत आता नव्याने विचार करण्याची गरज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी बोलून दाखविली आहे.