शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

६६ उमेदवारांचे ९२ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:25 IST

चौथा शनिवार, रविवार, त्यानंतर गांधी जयंती यामुळे तीन दिवस अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवार, गुरुवारी झुंबड उडाली. आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे.

ठळक मुद्देआमदार, माजी आमदार, माजी मंत्र्यांचा समावेश

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी ललितपंचमीचा मुहूर्त साधून आमदार, माजी आमदार, माजी मंत्र्यांसह दिग्गजांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, गोपाळराव पाटील, स्वाती कोरी, संग्रामसिंह कुपेकर, आदी दिग्गजांचा समावेश आहे. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने झुंबड उडणार आहे.

जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ६६ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले.चंदगड मतदारसंघातून १३ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले. यामध्ये संग्रामसिंह कुपेकर (शिवसेना), गोपाळराव पाटील (अपक्ष), स्वाती कोरी (जनता दल (धर्मनिरपेक्ष), अमर चव्हाण (राष्ट्रवादी), शिवाजी पाटील (अपक्ष व भाजप), विद्याधर गुरबे (अपक्ष), गंगाधर व्हसकोटी (वंचित बहुजन आघाडी), सुभाष देसाई (अपक्ष), श्रीकांत कांबळे (बसप), बाळेश बंडू, आदी प्रमुखांनी अर्ज भरले.

राधानगरीमध्ये माजी आमदार के. पी. पाटील (राष्टÑवादी), सत्यजित दिनकरराव जाधव (अपक्ष), अरुण डोंगळे (अपक्ष), शामराव रामराव देसाई (अपक्ष), आदींसह ११ जणांनी १५ अर्ज दाखल केले. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ (राष्टÑवादी), संजय घाटगे (शिवसेना), समरजित घाटगे (अपक्ष), दयानंद नानासो पाटील (अपक्ष), आदींसह सातजणांनी आठ अर्ज, कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज संजय पाटील (काँग्रेस) यांनी चार अर्ज, करवीरमध्ये राहुल पांडुरंग पाटील (कॉँग्रेस), अरविंद भिवा माने (अपक्ष), शैलाबाई शशिकांत नरके (शिवसेना), डॉ. आनंदा दादू गुरव (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह पाचजणांनी नऊ अर्ज; कोल्हापूर उत्तरमधून आमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना), संभाजी साळुंखे (अपक्ष), भरत देवगोंडा पाटील

काँग्रेस आघाडीकडून आतापर्यंत करवीरमधून पी. एन.पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ, दक्षिणमधून ऋतुराज पाटील, शिरोळमधून सावकर मादनाईक यांनी अर्ज भरले. आज, शुक्रवारी राधानगरीतून के. पी. पाटील, हातकणंगलेतून राजू आवळे, ‘उत्तर’मधून चंद्रकांत पाटील, चंदगडमधून राजेश पाटील, इचलकरंजीतून राहुल खंजिरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महायुतीकडून दक्षिणमधून अमल महाडिक, शाहूवाडीतून सत्यजित पाटील, शिरोळमधून उल्हास पाटील, हातकणंगलेतून सुजित मिणचेकर, ‘उत्तर’मधून राजेश क्षीरसागर, इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर, चंदगडमधून संग्राम कुपेकर, कागलमधून संजय घाटगे यांनी अर्ज भरले. आज शुक्रवारी राधानगरीतून प्रकाश आबिटकर हे उमेदवारी दाखल करणार आहेत.‘जनसुराज्य’कडून शाहूवाडीतून विनय कोरे यांनी अर्ज भरला आहे. हातकणंगलेतून अशोकराव माने आज, शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. अपक्ष म्हणून इचलकरंजीतून प्रकाश आवाडे यांनी अर्ज भरला आहे. आज हातकणंगलेतून ताराराणी पक्षाकडून किरण कांबळे व शिरोळमधून अर्चना संकपाळ अर्ज भरणार आहेत.

भाजपमधून बंडखोरी केलेले राहुल देसाई यांनी राधानगरीतून, तर कागलमधून समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. राधानगरीतून सत्यजित जाधव यांनीही अपक्ष अर्ज भरला. ‘उत्तर’मधून बंडा साळोखे, शिरोळमधून प्रमोद पाटील यांनीही अपक्ष अर्ज भरले आहेत. ‘वंचित’कडून राधानगरीतून जीवन पाटील यांनी अर्ज भरला.आज शेवटच्या दिवशी उडणार झुंबडकोल्हापूर : विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आज, शुक्रवारचा शेवटचा मुहूर्त साधण्यासाठी दिग्गजांची झुंबड उडणार आहे. यात करवीरमधून चंद्रदीप नरके, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, हातकणंगलेतून राजू आवळे, अशोकराव माने, ‘कोल्हापूर उत्तर’मधून चंद्रकांत जाधव व वसंतराव मुळीक, चंदगडमधून राजेश पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

अर्ज भरण्यासाठी २७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असली तरी पितृपक्ष आणि आघाडी-युतीच्या घोळामुळे प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागला आहे. त्यातच चौथा शनिवार, रविवार, त्यानंतर गांधी जयंती यामुळे तीन दिवस अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवार, गुरुवारी झुंबड उडाली. आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूर