शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी राजू शेट्टींना ९१ हजाराची मदत, शेतकरी कुटुंबाची कृतज्ञता 

By विश्वास पाटील | Updated: February 29, 2024 13:10 IST

कोल्हापूर : नांदणी ता. शिरोळ येथील भुपाल माणगावे यांचा आज ९१ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा मुलगा राजेंद्र माणगांवे ...

कोल्हापूर : नांदणी ता. शिरोळ येथील भुपाल माणगावे यांचा आज ९१ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा मुलगा राजेंद्र माणगांवे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवडणुकीसाठी ९१ हजारांचा निधी त्यांच्याकडे सुपर्द केला.शेट्टी म्हणाले, राजेंद्र मानगावे यांचा दोन दिवसापुर्वी फोन आला व त्यांनी सांगितले, २८ तारखेला वडिलांचा ९१ वा वाढदिवस कुटूंबियाच्यावतीने साजरा करणार आहोत आपण सायंकाळी भेट देवून शुभेच्छा देवून जावे. याप्रमाणे मी बुधवारी रात्री नांदणी येथील माणगावेकोडी मळ्यात शुभेच्छा देण्यासाठी गेलो. आई वडील दोघानांही शुभेच्छा दिल्यानंतर त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिम्मित माणगावे कुटूंबियाने चक्क लोकसभा निवडणुकीसाठी ९१ हजार रूपयाची लोक वर्गणी त्यांनी माझ्याकडे सुपुर्द केली. लोकसभेच्या २००४ पासून हे कुटुंबिय सातत्याने चळवळीसोबत राहिले आहे. गत वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नातवाच्या लग्नातही त्यांनी ५१ हजार रूपयाची देणगी दिली होती. आज वडीलांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा राजेंद्र माणगावे यांनी ९१ हजार रूपयाची लोकसभा निवडणुकीसाठी लोकवर्गणी देवून चळवळीस बळ देण्याच काम केल आहे. चळवळीवर प्रेम करणा-या अशा लोकांमुळेच मी गेल्या ३० वर्षापासून उजळ माथ्याने सांगत आलो आहे कि “मी जन्माला आलो त्यावेळेस माझा हात स्वच्छ होता, ज्यावेळेस शेवटचा श्वास घेईन तेंव्हासुध्दा दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी