म्हालसवडे येथे पोल्ट्रीत पाणी शिरून ९०० कोंबड्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:59+5:302021-06-18T04:17:59+5:30
म्हालसवडे : म्हालसवडे (ता. करवीर) येथील गणेश हिंदूराव पाटील या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ओढ्याचे पाणी शिरले. यामुळे ९०० कोंबड्यांचा ...

म्हालसवडे येथे पोल्ट्रीत पाणी शिरून ९०० कोंबड्यांचा मृत्यू
म्हालसवडे : म्हालसवडे (ता. करवीर) येथील गणेश हिंदूराव पाटील या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये ओढ्याचे पाणी शिरले. यामुळे ९०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
म्हालसवडे गावाशेजारील ओढयाजवळच्या शेतात गणेश पाटील यांचे पोल्ट्री फार्म आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अचानक ओढ्याचे पाणी पोल्ट्रीमध्ये शिरले. पोल्ट्रीमध्ये ३२०० पक्षी होते. यापैकी ९०० कोंबड्यांचा मृत्यू झाला. तर कोंबड्यांचे खाद्य भिजून खराब झाले. घटनेचा पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी एन. जे. पाटील, सरपंच संदीप कांबळे, कोतवाल गणपती कुंभार, पोलीस पाटील सागर शिंदे यांनी केला. यावेळी राजेश पाटील, धनाजी पाटील उपस्थित होते.
१७ म्हालसवडे पोल्ट्री
फोटो : म्हालसवडे (ता. करवीर) येथील पोल्ट्रीमधील नुकसानीचा पंचनामा करताना पशुवैद्यकीय अधिकारी एन. जे. पाटील, सरपंच संदीप कांबळे, धनाजी पाटील.