चंदगड मतदारसंघात ९० लाखांची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST2021-05-24T04:22:44+5:302021-05-24T04:22:44+5:30

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघात ‘क' वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रमातून ३० लाख आणि जनसुविधा कार्यक्रमातून ६० लाख मिळून ...

90 lakh works sanctioned in Chandgad constituency | चंदगड मतदारसंघात ९० लाखांची कामे मंजूर

चंदगड मतदारसंघात ९० लाखांची कामे मंजूर

गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघात ‘क' वर्ग यात्रा स्थळ विकास कार्यक्रमातून ३० लाख आणि जनसुविधा कार्यक्रमातून ६० लाख मिळून एकूण ९० लाखांची विकासकामे मंजूर झाली आहेत, अशी महिती आमदार राजेश पाटील यांनी दिली.

गावनिहाय मंजूर कामे व निधी कंसात : नूल हनुमान मंदिर सुशोभिकरण (१० लाख), निंगुडगे अमृतेश्वर मंदिर सुशोभिकरण (१० लाख), राजगोळी हनुमान मंदिर सुशोभिकरण (१० लाख), कडाल, श्रृंगारवाडी, म्हाळेवाडी, तळगुळी, मांगनूर, गजरगाव शिनोळी, हेरे व कानडी येथे जनसुविधा योजनेंतर्गत रस्त्यांसाठी (प्रत्येकी ५ लाख), जरळी भूमिगत गटारे बांधणे (१० लाख) व निलजी येथे भूमिगत गटारे बांधणे (५ लाख) असा निधी मंजूर झाला आहे.

जिल्हा नियोजन आणि विकास योजनेंतर्गत या कामांना निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे संबंधित गावांच्या विकासात भर पडली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 90 lakh works sanctioned in Chandgad constituency