शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६० खातेधारकांना ९ कोटींचा मोबदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 15:57 IST

१५ जुलैपूर्वी इतरांना वेळ : आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या भूसंपादनातील ११५ गटांपैकी २५ गटांतील ६० खातेधारकांना भूसंपादन विभागाकडून ९ कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे. उर्वरित गटातील खातेधारकांना १५ जुलैपूर्वी मोबदला स्वीकारून भूसंपादनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केले. खातेदारांच्या बैठकीत संबंधित गट क्रमांकातील विविध त्रुटी दूर करून खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. लवकरच उर्वरित गटातील भूसंपादनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा करवीरचे प्रांत हरीश धार्मिक यांनी व्यक्त केली आहे.कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात भूसंपादन विभागासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक, भूसंपादनचे अधिकारी विवेक काळे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी ३१ एकर जागेचे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करून भूसंपादन केले आहे. उर्वरित ३३ एकरांसाठी पुन्हा खासगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची तारीख निश्चित केली असून, त्यानंतर उर्वरित जमिनीचे २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. खरेदी थांबलेल्या ११५ गटांपैकी ४५ गटांचे थेट खरेदीचे प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. सोमवारी २५ गटांतील ६० खातेधारकांना ९ कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे धावपट्टीच्या भूसंपादनाचा मार्गही मोकळा झाला आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या खरेदीसाठी १५ जुलैपर्यंत संबंधित गटाचे प्रस्ताव तयार झालेले आहेत. त्याच्या खासगी वाटाघाटीसाठी संबंधित गटातील खातेधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली होती. यापूर्वीच्या मोबदल्यासाठी ४० खातेधारक तयार होते त्यानंतर सोमवारी आणखी ६० खातेधारकांनीही मोबदला स्वीकारल्याने आता फक्त २५ गटांतील खातेधारकांची संमती बाकी आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल. - हरीश धार्मिक, प्रांताधिकारी, करवीर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ