बाहुबली ब्रह्मचर्याश्रम विद्यापीठाचा ८७ वा वर्धापन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:29+5:302021-07-14T04:28:29+5:30
गुरुदेव समंतभद्रजी महाराजांनी शील, ज्ञान, प्रेम, सेवा आणि व्यवस्था या गुरुकुल पंचसूत्रीवर संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वावर काम ...

बाहुबली ब्रह्मचर्याश्रम विद्यापीठाचा ८७ वा वर्धापन उत्साहात
गुरुदेव समंतभद्रजी महाराजांनी शील, ज्ञान, प्रेम, सेवा आणि व्यवस्था या गुरुकुल पंचसूत्रीवर संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वावर काम सुरू असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठचे संचालक बी. टी. बेडगे गुरुजी, अधीक्षक ए. ए. खाडे, मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, सुनीता पाटील, पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, व्यवसाय विभागप्रमुख अरुण चौगुले, तांत्रिक विभागप्रमुख रवींद्र देसाई मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन एस. एस. पाटील यांनी केले तर, आभार उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी मानले.
फोटो
बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ८७ वा वर्धापन दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.