शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: शिवाजी विद्यापीठ येथे भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:17 IST

वाहनांची सततची वर्दळ या रस्त्यावरून असल्याने हा रस्ता असुरक्षित

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची मुख्य इमारत आणि समोरच्या रस्त्यापलीकडील विभाग यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गासाठी आठ कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करत निर्णय घेतला आहे.शिवाजी विद्यापीठाचा एकूण परिसर ८५३ एकर आहे. या जागेतून पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग आणि सध्या कोल्हापूर महापालिकेचा रस्ता जातो. या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. विद्यापीठाच्या पश्चिम भागात प्रशासकीय इमारत, विविध अधिविभागांच्या इमारती, क्रीडा संकुल अशा अनेक इमारती अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत.तर समोरच्या पूर्व भागात तंत्रज्ञान, स्कूल ऑफ नॅनो सायन्स, शाहू संशोधन केंद्र, शिक्षणशास्त्र, यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट, पत्रकारिता व संवादशास्त्र विभागाच्या इमारतीही उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या विद्यापीठासमोरील रस्त्यावरून रोज दोन ते तीन हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक आणि अभ्यागत ये-जा करत असतात.वाहनांची सततची वर्दळ या रस्त्यावरून असल्याने हा रस्ता असुरक्षित बनला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याचे ८ कोटी ४८ लाख ८१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांची मान्यता घेऊन शासनाकडे सादर केले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीला या निधीच्या मंजुरीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठroad transportरस्ते वाहतूक