शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 18:08 IST

उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी रविवारी ईर्ष्या, चुरस व तणावाच्या वातावरणात तब्बल ८४ टक्के मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी मतदान करून घेण्यावरून वादावादीचे प्रकार घडले असले, तरी कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. सरपंचपदाच्या ११९३ तर सदस्य पदाच्या ८९१५ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले असून उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.या टप्प्यात जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी ४४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ४३० ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. गेली पंधरा-वीस दिवस या गावांत प्रचाराची अक्षरश: राळ उडाली होती. काही गावांत सरळ लढत तर बहुतांशी ठिकाणी अटीतटीची तिरंगी लढत झाली होती. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.

बहुतांशी गावांत बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. मतदार आणण्यावरून, मतदान कोणी करायचे, यासह उमेदवारांच्या मतदान केंद्रातील वावरावरून शाब्दिक खडाजंगीही उडाल्या आहेत. त्यामुळे दिवसभर तणाव राहिला होता. काही ठिकाणी मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. मात्र, ते बदलल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली.झाडून मतदान करण्याचा प्रयत्नकमी मतदान असलेल्या गावांतील निकाल हा दोन-तीन मतांवर असल्याने येथे एका एका मतासाठी संघर्ष पहावयास मिळाला. त्यामुळे प्रत्येकाने आपापली मते झाडून बाहेर काढली होती.

कडक पोलिस बंदोबस्तराजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे पोलिसांच्या हिटलिस्टवर होती. त्यानुसार तिथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाद होऊ नयेत, यासाठी पाेलिसांचे प्रयत्न होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे भरारी पथक प्रत्येक गावात फिरत होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकVotingमतदान