शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कोल्हापूर जिल्ह्यात ‘प्रोत्साहन’चे ८३.८९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, अद्याप 'इतके' प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 16:28 IST

कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदानास दुसऱ्या यादीतील पात्र २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३ कोटी ८९ लाख रुपये जमा झाले ...

कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदानास दुसऱ्या यादीतील पात्र २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३ कोटी ८९ लाख रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार ८९६ शेतकऱ्यांना ५६२ कोटी ६९ लाख रुपये अनुदानाच्या रूपाने मिळाले आहेत. अद्याप ३२ हजार ६०७ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.राज्य सरकारने पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षातील पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून माहिती मागवली होती. जिल्ह्यातील तीन लाख ५७७ शेतकऱ्यांनी माहिती ऑनलाइन भरली होती. पहिल्या यादीत एक लाख २८ हजार ८०१ पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर एक लाख २० हजार ४३५ शेतकऱ्यांना ४४० कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. ५७ हजार पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी आली, मात्र अनुदान लवकर मिळाले नव्हते. मध्यंतरी दहा हजार ५०६ शेतकऱ्यांचे ३९ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान आले. उर्वरित शेतकऱ्यांपैकी २२ हजार ९५४ शेतकऱ्यांचे ८३ कोटी ८९ लाख रुपयांचे पैसे आले आहेत.

दुसऱ्या यादीतील प्रलंबित पात्र शेतकऱ्यांपैकी २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३.८९ कोटी वर्ग झालेले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत पाठपुरावा सुरू आहे. - नीळकंठ करे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)

 

 पहिली यादीदुसरी यादी
पात्र शेतकरी  १ लाख २८ हजार ८०१ ५७ हजार  
पैसे जमा झालेले १ लाख २० हजार ४३५ ३३ हजार ४६०  
रक्कम  ४४०.७० कोटी १२२.९९ कोटी 
शिल्लक शेतकरी८३६६३२६७

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीbankबँक