शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

Kolhapur: साके येथील दूध संस्थेत ८३ लाखांचा अपहार; सचिव व संचालकांसह अठरा जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:33 IST

कागल : साके (ता. कागल ) येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेत ८३ लाख ३ हजार ९४७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ...

कागल : साके (ता. कागल) येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेत ८३ लाख ३ हजार ९४७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव व संचालक मिळून अठरा जणांवर कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अठरा जणांमध्ये चार सचिव तर चौदा संचालक आरोपी असून, सहा संचालकांवर मृत्यू पश्चात गुन्हा दाखल झाला आहे. लेखापरीक्षक श्रेणी एक सहकारी संस्था कोल्हापूर राजेश जयसिंग हंकारे यांनी याबद्दलची तक्रार कागल पोलिसांत दिली आहे. तेरा वर्षे कालावधीत हा अपहार झाला आहे.

संस्थेचे तत्कालीन सचिव शामराव पाटील, बाजीराव चौगुले, नानासाहेब कांबळे, विद्यमान संचालक तानाजी चौगुले, ज्ञानदेव पाटील, बाळासाहेब पाटील, रघुनाथ पाटील, सुशीला पाटील, आंबुबाई घराळ, सुनीता पाटील, नमिता कांबळे, आनंदा पाटील, मोहन गिरी (सर्व रा. साके, ता. कागल), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तर तत्कालीन संचालक असणाऱ्या तुकाराम चौगुले, चंद्रकांत निऊंगरे, पांडुरंग पाटील, बाळासाहेब पाटील, गणपती चौगुले, गोविंद चौगुले यांचे निधन झाले आहे. ४ जानेवारी २००९ ते २१ मार्च २०२२ या कालावधीत हा अपहार झाला असून, आरोपींनी संगनमते संस्थेच्या रकमेचा अपहार केला आहे. त्यामध्ये पशुखाद्य बिले, दूध बिले, दूध फरक, कामगार खर्च, निवडणूक खर्च, मेहनताना खर्च, हात उचल, रेतन लस खरेदी आदी प्रकारच्या रकमा टाकून हा अपहार केला असून, यामध्ये सभासदांना उधारीवर पशुखाद्य पुरवठा रक्कम २८ लाख ८२ हजार ९८७ अशी आहे. तर अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेने ठेवलेल्या नऊ लाख रुपये रकमेचीही विल्हेवाट लावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.

साके गावातील मोठी दूध संस्थासाके गावात सर्वात जास्त दूध संकलन करणारी ही दूध संस्था सध्याही सुरू आहे. गावच्या मुख्य चौकात संस्थेची दुमजली इमारत आहे. एकाच राजकीय गटातील दोन अंतर्गत गटांच्या वादातूून तक्रारी होऊन हा अपहाराचा विषय चव्हाट्यावर आला. सध्या या एका इमारतीत दोन ठिकाणी वेगवेगळे दूध संकलन केले जात आहे.

संचालक सचिव गावातील कार्यकर्ते.. २००९ ते २०२२ या काळात म्हणजे तेरा वर्षे हा अपहार चालू होता. पण कोणतीच कारवाई होत नव्हती. सचिव व संचालक बदलत गेले; पण संस्थेमधील पैसे वेगवेगळ्या कारणांनी काढून घेणे थांबले नाही. सामान्य दूध उत्पादकांना याबद्दल फारसे घेणे-देणेही नव्हते. या संस्थेचे संचालक व सचिव गावातील प्रमुख कार्यकर्ते आहेत. यातील एक आरोपी नानासाहेब कांबळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बाजार समितीचे विद्यमान सदस्य आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkagal-acकागल